Breaking
ब्रेकिंग

संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी येथील एसएससी परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विठ्ठल अकॅडमी टेंभुर्णी यांच्या वतीने गुण गौरव

0 7 9 8 0 5

संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी येथील एसएससी परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विठ्ठल अकॅडमी टेंभुर्णी यांच्या वतीने गुण गौरव

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

कुर्डूवाडी: दि. १६/ कुर्डूवाडी येथील संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय मधील इयत्ता दहावी मध्ये प्रथम येणाऱ्या 8 विद्यार्थ्यांचा सन्मान माढा तालुका पंचायत समितीचे माजी सभापती तथा विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ चे चेअरमन सन्माननीय श्री विक्रमदादा शिंदे तथा आर्ट कॉलेजचे प्राचार्य डॉ. महेंद्र कदम सर यांच्या शुभहस्ते विद्यार्थी व पालक यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

याप्रसंगी माढा तालुक्यामधील सर्व माध्यमिक शाळा मधील विद्यार्थी पालक व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. याबद्दल जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ शिराळ चे संस्थापक अध्यक्ष श्री नंदकुमार टोणपे सर, संस्थेचे सचिव श्री रोहन टोणपे सर, कोषाध्यक्ष डॉ. रोहित टोणपे, मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर, कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. याबद्दल सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 9 8 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे