White amry व विविध वैद्यकीय संस्था कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जोतिबा यात्रेनिमित्त भाविकांना मोफत आरोग्य उपचार

White amry व विविध वैद्यकीय संस्था कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जोतिबा यात्रेनिमित्त भाविकांना मोफत आरोग्य उपचार
प्रतिनिधी सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ०३/ white army चे संस्थापक अध्यक्ष अशोक रोकडे, त्यांची शंभर जवानांची टीम व कोल्हापूर शहरातील विविध वैद्यकीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी कोल्हापूर येथील ज्योतिबा गड येथे श्री ज्योतिबा यात्रे दरम्यान भाविकांसाठी मोफत आरोग्यसेवा देण्यात आल्या. या संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवेचा येणाऱ्या भाविकांना भरपूर उपयोग होत आहे.
या यात्रेदरम्यान तब्बल ५ ते ७ हजार भाविकांना या संस्थेमार्फत उपचार मिळाला आहे. White army कडून दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो तसेच जिथे जिथे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते तीथे तिथे white army कडून वैद्यकीय सुविधा मोफत मध्ये पुरवली जाते.
हा उपक्रम गेली 22 वर्षापासून सदर संस्था राबवत आहे. 2002 चा आलेला महापूर, 2005 चा आलेला महापुर, 2011 च्या आलेला महापुर, 2019 चा आलेला महापूर, तसेच नेपाळ मध्ये झालेला महा भूकंप, उत्तराखंड मध्ये आलेला महापौर तसेच केरळ मध्ये आलेला महापूर अशा बऱ्याच ठिकाणी आज पर्यंत white army व कोल्हापूर शहरातील वैद्यकीय संस्था मार्फत येथे मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्यात आलेल्या आहेत. यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.



