जिल्हा विभागीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत करमाळा देशमुख चेस अकॅडमीची सिद्धी देशमुख विजयी:- राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
जिल्हा विभागीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत करमाळा देशमुख चेस अकॅडमीची सिद्धी देशमुख विजयी:- राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

प्रतिनिधी: सूर्यकांत होनप
करमाळा: दि. १२/ आज दि. १२/१०/२०२५ रोजी पुणे, वाघोली येथील लोणीकंद येथे महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक संचालनालय पुणे व मातोश्री सुलोचना प्रतिष्ठाण एच.डी. इंग्लिश मिडीयम स्कूल अॕण्ड ज्युनिअर कॉलेज, लोणीकंद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाविभागीय बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये करमाळा येथील देशमुख चेस अकॅडमीची खेळाडू सिद्धी पृथ्वीराज देशमुख हिने इयत्ता सहावी मधून 14 वर्षे वयोगटातून 6 पैकी 4.5 गुणांसह 5 वा क्रमांक पटकावत विजय संपादन केला. या विजयासह तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
पुणे येथील लोणीकंद येथे भरवण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये पुणे, सोलापूर व अहिल्यानगर या जिल्ह्यातील शालेय खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेतून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यात आली. यामध्ये सिद्धी पृथ्वीराज देशमुख हिने विजय प्राप्त केला. तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
सिद्धी देशमुख हिला करमाळा येथील देशमुख चेस अकॅडमीचे संचालक व प्रशिक्षक पृथ्वीराज देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सिद्धी देशमुख ही मुलींमध्ये करमाळा तालुक्यातील करमाळा शहरातील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होणारी पहिली खेळाडू ठरली. या विजयाबद्दल सिद्धी देशमुख यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच करमाळा चेस अकॅडमीचे संचालक व प्रशिक्षक पृथ्वीराज देशमुख यांचेही सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून सिद्धी देशमुख हिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच पुढील यशस्वी वाटचालीसाठी तीला शुभेच्छा देण्यात आल्या.



