Breaking
ब्रेकिंग

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा; भाषा बोलण्याने समृद्ध होते:- प्रा. विष्णू शिंदे

0 7 6 9 4 4

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा; भाषा बोलण्याने समृद्ध होते:- प्रा. विष्णू शिंदे

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २७/ यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयातील विज्ञान विभाग प्रमुख प्रा. विष्णु शिंदे हे बोलत होते ‘मराठी भाषा मातृभाषा असली तरी ती जागतिक पातळीवर महत्त्वाची भाषा आहे आणि आपण ती भाषा आचरणात आणली पाहिजे, तरच मराठी भाषा ही समृद्ध होईल. आपण ज्ञानभाषा म्हणून कोणतीही भाषा वापरत असलो तरी नवीन शैक्षणिक धोरणानुसार मराठीतून ज्ञानार्जनासाठी दालने खुली झालेली आहेत असे प्रतिपादन शिंदे यांनी केले.’

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. पी. माने हे होते त्यांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भाषा समृद्ध होण्यासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख केला आणि मराठी भाषा कशी समृद्ध आहे हे पटवून दिले.

या कार्यक्रमासाठी मराठी विभाग प्रमुख प्रा. नितीन तळपाडे हे व महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पृथ्वीराज इंगळे यांनी केले सूत्रसंचालन श्रीमती अनिता देशमुख यांनी तर उपस्थितांचे आभार डॉ. ज्ञानेश्वर सुपेकर यांनी मानले.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे