ज्योती क्रांती मल्टीस्टेट च्या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल:- रेडिओ ऑरेंज यांच्या वतीने ऑरेंज इंटरनॅशनल बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड २०२५ ज्योती क्रांती मल्टीस्टेट ला प्रदान
ज्योती क्रांती मल्टीस्टेट च्या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल:- रेडिओ ऑरेंज यांच्या वतीने ऑरेंज इंटरनॅशनल बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड २०२५ ज्योती क्रांती मल्टीस्टेट ला प्रदान

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २६/ रेडिओच्या क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या रेडिओ ऑरेंज यांच्या वतीने दिला जाणारा ऑरेंज इंटरनॅशनल बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड २०२५ ज्योती क्रांती मल्टीस्टेट ला प्रदान करण्यात आला. सुप्रसिद्ध अभिनेते मा. राहुल देव यांच्या हस्ते फुकेत (थायलंड) येथे झालेल्या भव्य समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा सन्मान संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. किरण वर्पे सर यांनी सन्मानपूर्वक स्वीकारला. गेल्या २५ वर्षांपासून ग्रामीण व शहरी भागांचा समतोल राखत आधुनिक कॉर्पोरेट बँकिंग सुविधा देणारी संस्था म्हणून ज्योती क्रांती मल्टीस्टेट नेहमीच एक पाऊल पुढे राहिली आहे. ग्राहकांचा विश्वास, पारदर्शकता, आणि तत्पर सेवा ही आमची खरी ओळख आहे. ग्राहकांच्या स्वप्नांना आर्थिक बळ देण्याच्या आमच्या वचनबद्धतेची ही आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेली पावती आहे.
हा पुरस्कार म्हणजे आपल्या सर्वांच्या अपार विश्वासाची आणि साथीतल्या भागीदारीची गौरवशाली नोंद आहे. आपल्या सर्वांच्या प्रेमाबद्दल व विश्वासाबद्दल ज्योती क्रांती परिवारातर्फे मनःपूर्वक आभार.
ज्योती क्रांती मल्टीस्टेट, महाराष्ट्र राज्य.



