भूम परंडा डेपोच्या सर्व बसेस गौंडरे फाट्यावर थांबणार; ग्रामस्थांनी मानले दिग्विजय बागल यांचे आभार

भूम परंडा डेपोच्या सर्व बसेस गौंडरे फाट्यावर थांबणार; ग्रामस्थांनी मानले दिग्विजय बागल यांचे आभार

प्रतिनिधी सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २६/ करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील गौंडरे फाटा येथे भूम परांडा येथील सर्व एस टी बसेस ला थांबा देण्यात येणार आहे अशी माहिती गौंडरे ग्राम पंचायत सदस्य ज्ञानेश्वर बिचितकर यांनी दिली आहे. पुढे बोलताना श्री बिचितकर म्हणाले की, गौंडरे फाटा येथे भूम परांडा आगारातील एस टी बसेस थांबा घेत नव्हत्या त्यामुळे आमच्या भागातील गौंडरे, निमगाव हवेली, कोळगाव, हिवरे व नेरले येथील बहुतांश लोक व शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात करमाळा व परांडा येथे ये जा करत असताना गैर सोय होत होती. तसेच भूम व परांडा आगारातील सर्व एस टी बसेस या ठिकाणी थांबा घेत नाहीत त्यामुळे आम्हा सर्व प्रवासी बांधवांना त्रास होत होता, त्यामुळे आम्ही करमाळा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिग्विजय भैय्या बागल यांना भेटून गौंडरे फाटा येथे भूम व परांडा आगारातील सर्व एस टी बसेस थांबा मिळवून द्यावी अशी मागणी केली होती.
दिग्विजय भैय्या बागल यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक व सबंधित अधिकारी यांच्याकडे निवेदन दिले होते. त्याला धाराशिव येथील विभाग नियंत्रक यांनी प्रतिसाद देत तसे लेखी पत्र दिले असून त्यामुळे सदरील काम मार्गी लागले आहे व आम्हा पूर्व भागातील विविध गावातील प्रवासी बांधवांना न्याय मिळवून दिल्या बद्दल दिग्विजय भैय्या बागल यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. याकामी श्री मकाई सह साखर कारखाना संचालक सतीश बापू नीळ यांचेही सहकार्य मिळाले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून आमची ही मागणी होती परंतु आम्हाला कोणीच न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला नाही. परंतु आत्ता भूम व परांडा आगारातील सर्व एस टी बस ला या ठिकाणी थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे आमची गैरसोय होणार नाही व आमचा वेळही वाया जाणार नाही. त्यामुळे आम्ही दिग्विजय भैय्या बागल यांचे मनःपूर्वक आभारी आहोत.
सुरज काळे शालेय विद्यार्थी



