Breaking
ब्रेकिंग

शिक्षणापासून आपल्या तालुक्यातील कोणतीही मुलगी वंचित राहू नये; ओम महिला मंडळाचा उपक्रम स्तुत्य:- मुख्याध्यापक श्री. संभाजी जगताप सर

0 7 6 9 4 3

शिक्षणापासून आपल्या तालुक्यातील कोणतीही मुलगी वंचित राहू नये; ओम महिला मंडळाचा उपक्रम स्तुत्य:- मुख्याध्यापक श्री. संभाजी जगताप सर

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १३/ साऊ जिजाऊ, फातिमाबी जयंती आणि संक्रांतीचे शैक्षणिक वाण म्हणून ओम महिला मंडळाने श्री गिरधरदास देवी विद्यालयातील इ. सातवीत शिकणारी मुलगी कु. गिता वाघमोडे हिस इ. १० वी पर्यंतच्या शिक्षणासाठी दत्तक घेतले. संक्रांतीचे हे शैक्षणिक वाण देऊन ओम महिला मंडळाने जीजाऊंच्या विचाराचा वारसा जपला असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मुख्याध्यापक संभाजी जगताप सर यांनी व्यक्त केले.

पुढे ते म्हणाले की आपल्या परिसरातील कोणतीही मुलगी परिस्थिती मुळे शिक्षणापासून वंचित राहू नये ही ओम महिला मंडळाची तळमळ मी गेल्या कित्येक वर्षांपासून पाहत आलो आहे. दरवर्षी अशा मुली शिक्षणासाठी दत्तक घेऊन एक सामाजिक जबाबदारी उचलणा-या या मंडळाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. यावेळी मा. नरतवडेकर सरांनी ही आपल्या मनोगतातून ओम महिला मंडळाचे कौतुक केले.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. वर्षा करंजकर, डॉ. कविता कांबळे, डॉ. अपर्णा भोसले उपस्थित होते. प्रास्ताविक मंडळाच्या अध्यक्षा साहित्यिका अंजली राठोड श्रीवास्तव यांनी केले. यावेळी त्यांनी सांगितले की, ओम महिला मंडळाने आजपर्यत ४० मुली शिक्षणासाठी दत्तक घेतल्या आहेत.

दत्तक घेतलेली विद्यार्थीनी कु. गिता वाघमोडे हिने यावेळी ओम महिला मंडळाचे आभार मानले व मी अभ्यास करून प्रशालेचे नाव मोठे करेन असे आश्वासन दिले.

यावेळी बोलताना शिक्षिका मा. अनिता कांबळे म्हणाल्या की महिलांचे प्रश्न, शैक्षणिक प्रश्न किंवा नैसर्गिक संकटे असो ओम महिला मंडळ तत्परतेने हजर असते.

यावेळी सुनिता यादव, अलका यादव, रेशमा जाधव, जयश्री लुणिया, मितवा अग्रवाल, शहनाज मोमीन यांनी स्वागतगीत सादर केले. तसेच ज्योती पांढरे, उषा बलदोटा, पुष्पा लुंकड, सुवर्णा लुणिया, लक्ष्मी कटारिया व पल्लवी निंबाळकर यांनी आगामी कार्यक्रमाची कल्पना देऊन मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन मा. गलांडे मॅडम यांनी केले तर जयश्री वीर यांनी आभार मानले.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे