Breaking
ब्रेकिंग

संजय मामांनी पाच वर्षात किती काम केले हे जनतेला सांगत बसण्याऐवजी आबांनी चालू एक वर्षात काय केले हे प्रवक्त्यांनी सांगावे:- ॲड. अजित विघ्ने यांचा पाटील गटाच्या प्रवक्त्यास प्रतिटोला

0 7 6 9 4 3

संजय मामांनी पाच वर्षात किती काम केले हे जनतेला सांगत बसण्याऐवजी आबांनी चालू एक वर्षात काय केले हे प्रवक्त्यांनी सांगावे:- ॲड. अजित विघ्ने यांचा पाटील गटाच्या प्रवक्त्यास प्रतिटोला

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १९/माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी 2019 ते 2024 या कार्यकाळात 3490 कोटींची विकास कामे केली ती कामे त्यांचा सत्ता कार्यकाळ संपल्यानंतर अजूनही वर्षानंतर सुरू आहेत. यावरूनच त्यांच्या विकास कामांची प्रचिती येते. हेच सहन न होऊन आमदार नारायण पाटील गटाचे प्रवक्ते दिशाहीन बोलत आहेत.

संजयमामा शिंदे यांनी करमाळा मतदार संघामध्ये पायाभूत सुविधांसाठी कोट्यावधींचा निधी मंजूर केला. HAM अंतर्गत दुर्लक्षित असलेल्या विहाळ, पोंधवडी, झरे, कोंढेज, निंभोरे या गावावरून जाणाऱ्या राजुरी ते वेणेगाव या रस्त्याला तब्बल 271 कोटी निधी मंजूर करून या गावांना विकासाच्या प्रवाहामध्ये आणले. डिकसळ पूल, कुगाव ते शिरसोडी पूल, आवाटी, राजुरी, रायगाव येथील सबस्टेशन, करमाळा उपजिल्हा रुग्णालय इमारत, दहिगाव उपसा सिंचन योजनेची बंद नलिकेद्वारे कामे, कमला भवानी मंदिर, पुरातत्व विभागाकडून भुईकोट किल्ला दुरुस्ती, समाज कल्याण विभाग, अल्पसंख्यांक विभाग तसेच पर्यटन विभागाकडून कोट्यावधींचा निधी ही कामे संजयमामांच्या विकास कामांची प्रचिती देतात.

विद्यमान आमदारांनी मात्र एक वर्षाच्या कालावधीमध्ये अर्थसंकल्पात एक नवीन रुपयाही अजून मंजूर करून आणलेला नाही हे अपयश झाकण्यासाठी तहसीलदारांवरती हक्कभंग दाखल करणे आणि जनतेची दिशाभूल करणे अशी संकुचित मानसिकता ज्यांची आहे त्याच्या प्रवक्त्यांनी संजय मामावरती बोलू नये असे आवाहन ॲड. अजित विघ्ने यांनी केले आहे. केवळ खंडणी साठी दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बंदनलिकेचे काम रोखून धरणे, जातेगाव ते टेंभुर्णी या रस्त्याचे काम न होणे, तहसील कार्यालय इमारतीसाठी आलेला निधी खर्च न करणे, नगरपरिषद इमारत, सांस्कृतिक भवन व छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा अशा कामांसाठी संजयमामा शिंदे यांनी निधी मंजूर करूनही ती कामे सुरू न करणाऱ्या विद्यमान आमदारांच्या ना कर्तेपणाचा पाडा हा मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढणाराच आहे याकडेही प्रवक्त्यांनी लक्ष द्यावे असा घनाघात राष्ट्रवादी माजी आ. संजयमामा शिंदे गटाचे प्रवक्ते ॲड. अजित विघ्ने यांनी केला आहे.

माजी आमदार संजयमामा शिंदे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेपासुन आजपर्यंत त्यांनी करमाळा विधानसभा क्षेत्रात कोट्यावधींची विकासकामे केली आहेत. करमाळा विधानसभा मतदारसंघाशी त्यांची नाळ आता पक्की झाली असुन विधानसभेला मिळालेले मतदान आणि आदिनाथ कारखान्याला मिळालेले वाढते मतदान पाहुन सर्वसामान्य जनता मामांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे कोणी कितीही वल्गना केल्या आणि युती आघाडया केल्या तरी माजी आमदार संजयमामा शिंदे करमाळा तालुक्याच्या कर्मभुमीत कायम राहणार आहेत. वस्तुतः राजकारणात प्रत्येक गटाचे आपआपले अस्तित्व आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे गटानेही आपले अस्तित्व व कार्यकर्त्यांचे जाळे आता गावोगावी तयार केलेले आहे. करमाळा नगरपरिषद निवडणुकीत ज्या पाटील गटाचा एकही नगरसेवक निवडणुकीत लढताना दिसला नाही. आणि विधानसभेला साथ दिलेल्या सावंत आणि जगताप गटाला कोणाला नेमकी साथ दिली याचा थांगपत्ता लागू दिला नाही. त्यामुळे संधीसाधुपणा बुरखा आगामी काळात ह्याच गटाकडून काढला जाईल यामुळे आणि आदिनाथ कारखान्याला व विधानसभेला दिलेली आश्वासने पुर्ण होत नाहीत यामुळे लोकांमधे वेगळा मेसेज द्यायचा आणि स्वतःचे अपयश झाकुन ठेवायचे काम पाटील गटाचे प्रवक्ते हे नेहमीच करतात. त्यामुळे त्यांना विद्यमान आमदार, आदिनाथचे चेअरमन कोण आहे याचा विसर पडला असल्याचे परखड मत राष्ट्रवादीचे प्रवक्ते ॲड. अजित विघ्ने यांनी प्रतिक्रिया देताना व्यक्त केले आहे.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे