Breaking
ब्रेकिंग

ब्रँड अँबेसेडर महेश वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली स्काय एवेन्यू सोसायटी बदलापूर येथे सशक्त भारत व नशा मुक्त भारत अभियान संपन्न; महिलांचा विशेष सहभाग

0 4 3 5 8 9

ब्रँड अँबेसेडर महेश वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली स्काय एवेन्यू सोसायटी बदलापूर येथे सशक्त भारत व नशा मुक्त भारत अभियान संपन्न; महिलांचा विशेष सहभाग

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ३०/ समाजात व्यायामाप्रती आवड निर्माण करणे आरोग्याचे महत्त्व समजून सांगणे, व्यायामाप्रती आवड निर्माण करून जनजागृती करणे हाच ध्यास घेऊन नशा मुक्त भारत अभियानचे ब्रँड अँबेसेडर व सशक्त भारत अभियान चे प्रशिक्षक महेश वैद्य हे सशक्त भारत व नशा मुक्त भारत अभियानचे काम करत आहेत. हळूहळू या कामास व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे. सर्व स्तरावरून याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. बदलापूर मध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये आणि शाळांमध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याचा मानस महेश वैद्य यांनी व्यक्त केला. त्या कामात ते स्वतःला झोकुन देऊन सर्वत्र व्यापक स्वरूपात काम करत आहेत.

स्काय एवेन्यू सोसायटी बदलापूर येथे सशक्त भारत व नशा मुक्त भारत अभियान मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या अभियानामध्ये महिलांनी विशेष सहभाग नोंदविला. सशक्त भारत अभियान या कार्यक्रमात महिलांनी विशेष करून भाग घेऊन बेसिक व्यायामाचे ट्रेनिंग आत्मसात केले. अशा प्रकारचे उपक्रम नित्यनेमित व्हावेत अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी श्री व सौ गजानन जाधव, तसेच सौ. चव्हाण मॅडम, सौ. येसरे मॅडम व इतर महिला, तसेच श्री सावंत साहेब उपस्थित होते. प्रणय यांनी या उपक्रमास हजेरी लावली. प्रशिक्षक महेश वैद्य यांच्या सोबत प्रशिक्षिका यशश्री कुलकर्णी उपस्थित होत्या. त्यांनी व्यायाम कसा करायचा याचे प्रत्यक्ष ट्रेनिंग सर्वांसमोर सादर केले. 

यावेळी वेळोवेळी आमचे सहकारी श्री किसन कांबळे सर, दिनेश सोरटे साहेब, संजय अण्णा मोरे, प्रताप कांबळे, ॲड. अजय दिवाण, उद्योगपती महेश दोशी, तसेच बाळासाहेब होशिंग आणि पत्रकार सूर्यकांत होनप यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच समाज कल्याण असिस्टंट कमिशनर ऑफ सोशल वेल्फेअर सोलापूर जिल्हा सौ. सुलोचना महाडिक सोनवणे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

महेश वैद्य यांचे सर्वांनी आभार मानले. हा कार्यक्रम अतिशय खेळी-मेळीच्या वातावरणात पार पडला.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 5 8 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे