Breaking
ब्रेकिंग

दि. 30 जून ते 6 जुलै 2025 पर्यंत स्काय एवेन्यू सोसायटी आणि वनमाला वैद्य बहुउद्देशीय सामाजिक संस्था आयोजित फिटनेस कॅम्प चे आयोजन

0 7 6 9 3 7

दि. 30 जून ते 6 जुलै 2025 पर्यंत स्काय एवेन्यू सोसायटी आणि वनमाला वैद्य बहुउद्देशीय सामाजिक संस्था आयोजित फिटनेस कॅम्प चे आयोजन

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ०१/ दि. 30 जून ते 6 जुलै 2025 पर्यंत स्काय एवेन्यू सोसायटी आणि वनमाला बबनराव वैद्य बहुउद्देशीय सामाजिक संस्था आयोजित फिटनेस कॅम्प चे आयोजन करण्यात आले आहे. बदलती जीवनशैली आणि आरोग्य विषयक समज गैरसमज यावर प्रबोधन आणि मार्गदर्शन तसेच प्रत्यक्ष कृतीद्वारे व्यायाम आणि व्यायामाचे जीवनातील महत्त्व या विषयावर नशा मुक्त भारत अभियानाचे ब्रँड अँबेसिडर आणि सशक्त भारत अभियानाचे प्रशिक्षक विक्रम वीर महेश वैद्य हे मार्गदर्शन करणार आहेत. याचा लाभ सोसायटीतील सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन स्काय एवेन्यू सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.

सशक्त राष्ट्र बनविण्यासाठी समाजातील सर्व घटक पुरुष महिला बाल वृद्ध हे निरोगी असणे खूप गरजेचे आहे आणि त्यावरच महेश वैद्य हे अतिशय तळमणीने काम करत आहेत. हळूहळू त्याला सर्व स्तरातून चांगल्या पद्धतीने पाठिंबा मिळत आहे. हे एक सशक्त राष्ट्र बनविण्यासाठी आशावादी पाऊल आहे. याची गरज शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत आहे. या अभियानाला प्रत्येक व्यक्ती जोडला गेला पाहिजे तर आपले राष्ट्र बलशाली, सशक्त निरोगी आणि सर्वार्थाने नशा मुक्त राहील. ज्या व्यक्तीला व्यायामाचे आपल्या आरोग्याचे महत्त्व समजले आहे अशी व्यक्ती सहसा व्यसनाच्या आहारी जात नाहीत असे स्पष्ट मत महेश वैद्य यांनी व्यक्त केले.

कोरोना नंतर हळूहळू आपण पूर्वपदावर येत आहोत येताना खूप त्रास होतो आहे कारण का कोरोना काळात सर्वांनी थोड्याफार प्रमाणात वाईट अनुभव घेतले आहेत आणि त्यावेळेसच रोगप्रतिकार शक्ती म्हणजेच इम्युनिटी पावर असे शब्द कानी पडायला लागले ते नेमकं काय असते याची जाणीव कोरोना काळात आपल्याला झाली आणि आपली पावले हळूहळू व्यायामाकडे वळली. आपले जीवन निरोगी ठेवायचे असेल तर आपण दररोज किमान 40 मिनिटे व्यायाम केला पाहिजे असे प्रतिपादन महेश वैद्य यांनी केले. महेश वैद्य हे स्वतः एक खेळाडू आहेत त्यामुळे आजची मुलांची शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी जेवढे शक्य असेल तेवढे प्रयत्न ते करत आहेत. प्रत्येक गावात शहरात अशा प्रकारचे फिटनेस कॅम्प होणे आणि त्यासाठी जनजागृती होणे प्रचार आणि प्रसार होणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्यानुसारच पुढील आराखडा तयार केला आहे. त्यानुसार काम टीमवर्क बनवून केले जाईल असे महेश वैद्य यांनी सांगितले. नशा मुक्त भारत + सशक्त भारत = सशक्त राष्ट्र हे सत्यात उतरवायचे आहे आणि त्यासाठी आयुष्यभर काम करायचे आहे यासाठीच जीवन समर्पित आहे असे महेश यांनी आपले मनातील भाव प्रकट केले.

या उपक्रमात दिवसेंदिवस मिळणारा चांगला प्रतिसाद त्यामुळे काम करण्याची प्रेरणा मिळते आणि ऊर्जा मिळते. मला माझी आई वन मला बबनराव वैद्य यांच्यापासून प्रेरणा मिळते. माझी प्रेरणास्तव माझी आई आहे आणि त्यामुळेच मी हे कार्य करू शकतो अशी भावना महेश वैद्य यांनी व्यक्त केली.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 3 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे