Breaking
ब्रेकिंग

पेण मधील सुरेश उर्फ सूर्यकांत पाटील व भरत पाटील या सावकारांवर अलिबाग पोलिसांची धडक कारवाई; घर, हॉटेल व कार्यालयाच्या झडतीत शेकडो चेक, बॉण्ड पेपर केले जप्त

0 7 6 9 3 4

पेण मधील सुरेश उर्फ सूर्यकांत पाटील व भरत पाटील या सावकारांवर अलिबाग पोलिसांची धडक कारवाई; घर, हॉटेल व कार्यालयाच्या झडतीत शेकडो चेक, बॉण्ड पेपर केले जप्त

प्रतिनिधी: राजेश बाष्टे

अलिबाग: दि. २०/ पेण तालुक्यात अनेक सावकारांचा पैसे देणे-घेणेचा अनधिकृत धंदा सुरू आहे. अनेकजण या सावकारांच्या जाचाला कंटाळून स्वतःच्या जीविताचे बरे वाईट करण्याच्या विचारात आहेत. अश्यावेळी हा सावकारीचा गोरखधंदा चालविणाऱ्या पेण तालुक्यातील चिंचपाडा येथील तथा गोमांतक हॉटेलचे मालक सुरेश उर्फ सूर्यकांत जोमा पाटील व भरत पाटील ह्या दोन बड्या सावकारांना अलिबागच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने व सहाय्यक निबंधक सावकारी संस्था पेण यांनी धडक कारवाई करत दणका दिला आहे. जनतेची पिळवणूक करून त्यांची आर्थिक लूट करणे त्यांना महागात पडले आहे. या दोघांविरोधात कारवाई करून त्यांच्या घराची, गोमांतक हॉटेल व कार्यालयाची झाडाझडती घेत शेकडो धनादेश, बॉण्ड पेपर, वचन चिठ्ठ्या व इतर संशयास्पद कागदपत्रे ताब्यात घेण्यात आले आहेत.

रायगड पोलीसांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकातील माहितीनुसार, सुर्यकांत उर्फ सुरेश जोमा पाटील आणि भरत पाटील असे पेण मधील दोन बड्या सावकारांची नावे आहेत. या दोघांनी मिळून पेणमध्ये सावकारीचा धंदा चालू केला आहे. परंतु, आर्थिक अडचणीत अडकलेल्याकडून अधिकचे पैसे उकळून त्यांच्याकडून आर्थिक लूट केली जात आहे. त्यामुळे त्यांच्या या सावकारी जाचाला कंटाळलेल्या पेण मधील दोन तरुणांनी रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांची भेट घेतली. त्यांच्याकडे सावकारांच्या पिळवणुकीचे गाऱ्हाणे मांडून लेखी तक्रारही दिली. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक मिलींद खोपडे यांच्या नेतृत्वाखाली तीन पथक तयार करण्यात आले. सोबत सहाय्यक निबंधक सावकारी संस्था पेणचे सुभाष काळे व इतर अधिकाऱ्यांसह संयुक्त कारवाई करण्यास सुरूवात केली. त्यांनी एकाचवेळी सूर्यकांत उर्फ सुरेश पाटील त्यांच्या घरी, गोमांतक हॉटेल व कार्यालय ठिकाणी छापे टाकले. त्यावेळी कर्जदारांकडून लिहून घेतलेल्या शेकडो वचन चिठ्ठ्या, धनादेश, बॉण्ड पेपर व मिळालेली इतर कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

सदर सावकारांवर कारवाई यशस्वी करण्यासाठी रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक मिलींद खोपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रसाद पाटील, प्रसन्ना जोशी, पोलीस हवालदार मोरेश्वर ओंबळे, महिला पोलीस हवालदार अस्मिता म्हात्रे, रेखा म्हात्रे, झुलिता भोईर, पोलीस हवालदार सचिन वावेकर, पोलीस शिपाई ईश्वर लांबोटे, बाबासो पिंगळे, अक्षय जगताप, ओमकार सोंडकर व सहाय्यक निबंधक सावकारी संस्था पेणचे सुभाष काळे यांनी मेहनत घेतली.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 3 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे