Breaking
ब्रेकिंग

लोकमंगल पतसंस्थेच्या करमाळा शाखेत मकर संक्रांत निमित्त हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न

0 7 6 9 3 7

लोकमंगल पतसंस्थेच्या करमाळा शाखेत मकर संक्रांत निमित्त हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. आज दिनांक 21/01/2026 रोजी आपल्या लोकमंगल पतसंस्थेच्या करमाळा शाखेत मकर संक्रांत निमित्त हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाची सुरुवात करमाळा नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्षा सौ. मोहिनीताई सावंत यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आली.

यावेळी शाखेचे सल्लागार डॉ. सौ. सुनीता दोशी यांनी आपल्या लोकमंगल पतसंस्थेची व समूहाच्या कार्याची थोडक्यात माहिती उपस्थित महिलांना सांगितली. सदर कार्यक्रमास उपस्थित सर्व महिला खातेदार यांना अहवाल ,कॅलेंडर, माहिती पत्रक व वाण देण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित महिलांना पतसंस्थेचे वेगवेगळ्या योजनेची माहिती शाखेचे महिला कर्मचारी सौ. आरती पतंगे मॅडम यांनी सांगितली.

सदर कार्यक्रमास करमाळा शहरातील महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. हा कार्यक्रम आनंदात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.

सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाखाधिकारी, शाखेतील महिला कर्मचारी सौ. काळे सुलभा, कु. सलोनी शिंदे, महेश अनारसे यांनी परिश्रम घेतले.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 3 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे