करमाळ्यात लॉजवर सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा करमाळा पोलिसांनी केला पर्दाफाश; एकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

करमाळ्यात लॉजवर सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा करमाळा पोलिसांनी केला पर्दाफाश; एकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २१/ करमाळ्यातील भवानी पेठेत लॉजवर सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा करमाळा पोलिसांनी पर्दाफाश केला असून ३ पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांचे अधिकारपत्र घेऊन पोलिस निरिक्षक रणजित माने यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. स्वतः लॉज मालकच देहविक्री करण्यासाठी ग्राहकांना महिला पुरवण्याचे काम करत होता. त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. याचा तपास स्वतः पोलिस निरीक्षक रणजीत माने हे करत आहेत. प्रथमेश सुनील राठोड (वय २२, रा. भवानी पेठ, करमाळा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
करमाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक रणजीत माने यांना माहिती मिळाली होती की, करमाळ्यातील भवानी पेठेतील कमलाभवनी लॉजमध्ये महिलांकडून देहविक्रीचा व्यवसाय करवून घेतला जात आहे. प्रत्येक ग्राहकामागे त्याला ५०० रुपये मिळत होते. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी (ता. २०) सायंकाळी साडेसहा च्या सुमारास संबंधित ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून तपासणी केली. तेव्हा तेथील एका खोलीत देहविक्री करण्यासाठी आणलेल्या तीन महिला सापडल्या. संशयित आरोपीवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ च्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस पथकामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक पोपट टिळेकर, विश्वास शिनगारे, पोलिस उपनिरीक्षक दादासाहेब वाडगे, पोलिस हवालदार भाऊसाहेब शेळके, अप्पासाहेब लोहार, पोलिस शिपाई मिलिंद दहिहंडे, स्वप्नील शेरखाने, महिला पोलिस शीतल पवार यांचा समावेश होता.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.