श्री कमला भवानी मंदिर जीर्णोद्धारासाठी श्री नारायण खंडागळे यांचे कडून २,२२२/ ₹. देणगी कमला भवानी चरणी अर्पण

श्री कमला भवानी मंदिर जीर्णोद्धारासाठी श्री नारायण खंडागळे यांचे कडून २,२२२/ ₹. देणगी कमला भवानी चरणी अर्पण

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ०३/ करमाळा येथील श्री कमला देवी मंदिर जीर्णोद्धारासाठी दि. ०३/०६/२०२६ रोजी नारायण किसनराव खंडागळे रा. करमाळा, यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त इतरत्र खर्च न करता २,२२२/ ₹. देणगी श्री कमलादेवी मंदिर जतन संवर्धन कामस अर्पण केली. यावेळी श्री कमला देवी मंदिर समितीकडून अशोक गाठे व्यवस्थापक, पद्माकर सुर्यपुजारी, रघुनाथ खटके यांच्या हस्ते त्यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी खंडागळे परिवार, मानकरी, सेवेकरी, भक्तगण इत्यादी उपस्थित होते.
श्री कमलादेवी मंदिराचे पुरातन दगडी स्वरूपातील असलेले मुळ मंदिराचे दर्शन भाविक भक्तांना मिळणार आहे. श्री जगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टच्या संयोजकाने श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या वर्षापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून भक्तांच्या देणगी रूपी सहकार्यातून या कामास सुरुवात करण्यात आलेली आहे.
श्री कमलादेवी मंदिर जतन संवर्धन काम प्रगती पथावर असल्याकारणाने भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन या कामात सहकार्य करण्याचे आव्हान देखील श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट करमाळा यांचे कडून करण्यात आलेले आहे. तसेच ऑनलाईन देणगीची सुविधाही उपलब्ध आहे.
देणगीसाठी संपर्क:- अशोक गाठे व्यवस्थापक. मो. नं. ९४०४७०८९२४ / ९५७९९६१७७४.



