Breaking
ब्रेकिंग

विद्यार्थ्यांनी पालकांच्या कष्टांची जाण ठेवून शिक्षणात प्रगती करावी:- मा. गणेशजी शिंदे

0 7 6 9 4 3

विद्यार्थ्यांनी पालकांच्या कष्टांची जाण ठेवून शिक्षणात प्रगती करावी:- मा. गणेशजी शिंदे

प्रतिनिधी: सूर्यकांत होनप

करमाळा: दि. ३०/ दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स या महावि‌द्यालयात डिग्री इंजिनिअरिंग, डिप्लोमा इंजिनिअरिंग, एमबीए व एमसीए या अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी भव्य स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्रातील प्रख्यात व प्रभावी व्यक्तिमत्त्व मा. गणेशजी शिंदे उपस्थित होते. वि‌द्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की दत्तकला शिक्षण संस्थेत प्रवेश घेणाऱ्या सुमारे 90 टक्के विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात. या वि‌द्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे कष्ट व त्याग नेहमी डोळ्यासमोर ठेवावा. पालकांनी शेतामध्ये अथक परिश्रम करून शिक्षणासाठी पैसा उपलब्ध करून दिला आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून प्रामाणिकपणे अभ्यास करावा.

शिंदे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना सांगितले की, आपण ग्रामीण भागातील असलो तरी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शिस्त, मेहनत आणि नाविन्यपूर्ण विचारसरणी यांच्या जोरावरच तांत्रिक शिक्षणाचे खरे उ‌द्दिष्ट साध्य करता येते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना संस्थेच्या कार्याचा आढावा मांडला. दत्तकला शिक्षण संस्था ही नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्नशील राहिली आहे. उत्कृष्ट शिक्षकवृंद, अत्याधुनिक प्रयोगशाळा व संशोधनाची संधी उपलब्ध करून देणे हा आमचा नेहमीचा प्रयत्न असतो. आजच्या युगात तांत्रिक शिक्षण ही काळाची गरज आहे. केवळ पदवी घेऊन थांबून चालणार नाही, तर संशोधनाकडे वाटचाल केली पाहिजे. संशोधनाधारित शिक्षणामुळेच विद्यार्थी जागतिक स्तरावर आपली छाप पाडू शकतात. भविष्यातील संधी आणि आव्हाने पेलण्यासाठी विद्यार्थ्यांनी व्यावहारिक जानासोबतच संशोधनवृती जोपासली पाहिजे असे ते म्हणाले.

कार्यक्रमाला संस्थेच्या सचिव सौ. माया झोळ उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत करून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास बाळगून शिक्षणात प्रगती साधावी, तसेच आपल्या पालकांचे, शिक्षकांचे आणि समाजाचे ऋण फेडण्यासाठी सतत पुढे सरसावले पाहिजे. शिक्षणाच्या बरोबरीने चारित्र्य, संस्कार व सामाजिक जबाबदारी जोपासणे आवश्यक आहे. वि‌द्यार्थी आत्मविश्वासाने पुढे जातील, यासाठी संस्था सदैव सोबत आहे, असे मार्गदर्शन केले.

स्वागत समारंभाला महाविद्यालयाचे डायरेक्टर प्रा. श्रीकांत साळुंके, प्रिन्सिपल डॉ. एस ए पाटील तसेच सर्व विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व नव्याने प्रवेश घेतलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्षात शिकणारी वि‌द्यार्थिनी कु. शिवानी बिडवे व कु. शृष्टी अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. नरेश घोरपडे यांनी मानले.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे