बळवंत वालेकर यांचा ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे सन्मान व सत्कार
बळवंत वालेकर यांचा ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे सन्मान व सत्कार
प्रतिनिधी: राजेश बाष्टे
अलिबाग: दि. ०९/ ज्येष्ठ सदस्य व सल्लागार बळवंत वालेकर सर यांची रायगड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संस्थांच्या समन्वय समितीच्या कार्यकारिणीवर निवड झाल्याबाबत ज्येष्ठ नागरिक संस्था कामार्ले विभाग वाघोली यांचे कडून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन संस्थेचे अध्यक्ष दामोदर ठाकूर यांच्याहस्ते सन्मान केला.
या संथेची सभा संस्थेच्या वाघोली येथील कार्यालयात आयोजिली होती . या सन्मानाबाबत सत्कारमूर्ती ने आपल्या भाषणात क्रुतज्ञता व्यक्त केली. सदर सभेत अन्य विषयाबरोबर दि. २१ सप्टेःबर २५ रोजी साजरा करावयाच्या वर्धापनदिनावर विशेष चर्चा झाली. सदस्यांच्या अंगी असणाऱ्या विविध कला- गुणांना संधी देण्याचे ठरले.
या सभेत अनेक सदस्यांनी संस्थेच्या प्रगतीबाबत अनेक सूचना केल्या. शेवटी उपाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष दामोदर ठाकूर, उपाध्यक्ष नंदकुमार पाटील, सेक्रेटरी दत्तात्रेय नांदेकर, खजिनदार जनार्दन पाटील, सहखजिनदार मधुकर पाटील तसेच एकनाथ राघो म्हात्रे, प्रकाश जोमा पाटील, प्रदीप पाटील, नरेंद्र (बाळू) पाटील, चंद्रकांत जगताप, श्रीमती प्रतिभा खा़डेकर, दत्तात्रेय चांगू वाघपंजे, सौ, पुष्पा दामोदर ठाकूर, मधुकर भगवान वालेकर, बाळाराम महादेव पाटील, शरद शिंगरुत इ. उपस्थित होते.



