Breaking
ब्रेकिंग

करमाळा शहराचा सर्वांगीण विकास करणे हेच ध्येय:- जगदीश अग्रवाल (प्रभाग क्रमांक ६ चे भाजपचे उमेदवार)

0 7 6 9 3 4

करमाळा शहराचा सर्वांगीण विकास करणे हेच ध्येय:- जगदीश अग्रवाल (प्रभाग क्रमांक ६ चे भाजपचे उमेदवार)

प्रतिनिधी: सूर्यकांत होनप

करमाळा: दि. २७/ करमाळा शहरातुन प्रभाग क्रमांक ६ मधून उभे राहिलेले भाजपचे उमेदवार जगदीश अग्रवाल हे भारतीय जनता पार्टीचे करमाळा शहर अध्यक्ष आहेत. 

जगदीश अग्रवाल हे भाजपाचा एक कार्यकर्ता ते भाजप करमाळा शहराध्यक्ष पदापर्यंत काम करताना जगदीश अग्रवाल यांनी समाजसेवेला प्रथम प्राधान्य दिले. यांनी केशव प्रतिष्ठानच्या माध्यमातून भरपूर समाजसेवेचे कार्य केले आहे. जसे रक्तदान शिबिर, वृक्षारोपण रुग्णवाहिका, पाण्याचे टँकर, बेरोजगारांना रोजगार, कोरोना काळात गरजवंतांना मदत असे वेगवेगळ्या प्रकारे ते समाजसेवा करत आले.

जगदीश अगरवाल यांना शहरातील नागरिकांच्या अडचणी सोडवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. शहरातील नागरिकांच्या समस्या तसेच करमाळा शहराचा सर्वांगीण विकास जसे करमाळा शहरातील रस्ते, सुरळीत पाणीपुरवठा, स्वच्छ व सुलभ शौचालय, महिलांच्या सुरक्षा, असा सर्वांगीण शहराचा विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून जगदीश अग्रवाल हे करमाळा नगरपालिकेला भारतीय जनता पार्टी कडून प्रभाग क्रमांक ६ मधून नगरसेवक पदासाठी निवडणुकीस उभे राहिलेले आहेत.

जनतेने जर मत रुपी आशीर्वाद दिले तर करमाळा शहरासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून करमाळा शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असु असे आश्वासन जगदीश अग्रवाल यांनी नागरिकांना दिले आहे.

5/5 - (2 votes)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 3 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे