कमलाई प्रो ऍक्टिव्ह अबॅकस क्लासेसच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

कमलाई प्रो ऍक्टिव्ह अबॅकस क्लासेसच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २५/ कमलाई प्रो ऍक्टिव्ह अबॅकस क्लासेसच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यश कल्याणी सेवाभावी संस्थेकडून अबॅकस ग्रॅज्युएट विद्यार्थिनींना प्रत्येकी ₹3000 ची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. दि. 11 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल अबॅकस परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून 8000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी कमलाई प्रो ऍक्टिव्ह अबॅकस क्लासेसच्या एकूण 32 विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला. या परीक्षेचे उद्दिष्ट सहा मिनिटांत 100 गणिते सोडवणे असे होते. या परीक्षेचा निकाल दि. 11 डिसेंबर रोजी जाहीर झाला.
या परीक्षेत कमलाई क्लासेसची विद्यार्थिनी कु. ईशानी अमोल गायकवाड (इयत्ता पहिली) हिने अवघ्या 4 मिनिटे 41 सेकंदांत 100 पैकी 100 गणिते अचूक सोडवून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच लहान गटात वैभवी औदुंबर माकुडे (वय 5) हिने 70 पैकी 67 गणिते अचूक सोडवून दुसऱ्या फेरीत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला. कमलाई क्लासेसच्या 32 विद्यार्थ्यांपैकी प्रथम क्रमांक प्राप्त करणारे 6 विद्यार्थी, द्वितीय क्रमांक मिळवलेली 1 विद्यार्थिनी व तृतीय क्रमांक प्राप्त करणारे 6 विद्यार्थी तसेच कॉन्सोलेशनमध्ये निवड झालेले 11 विद्यार्थी आणि फायनलिस्ट ठरलेले 8 विद्यार्थी असे उल्लेखनीय यश कमलाई वो ऍक्टिव्ह अबॅकस च्या विद्यार्थ्यांनी संपादन केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा शुक्रवार, दि. 24 एप्रिल रोजी यश कल्याणी सेवा भवन येथे संपन्न झाला.
यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे:-
प्रथम क्रमांक:-अर्पिता परदेशी (लेवल 1st A), राघव चिवटे (लेवल 1st), वरून शेंडगे (लेवल 2nd), श्रेया चव्हाण (लेवल 5th).
द्वितीय क्रमांक विजेते:- ईश्वरी माकुडे (लेवल 1st).
तृतीय क्रमांक विजेते:- स्वराज बनकर (जुनिअर लेव्हल), स्वरा बनकर (सिनिअर लेव्हल), दिया कामटे (लेवल 1st), श्रेयश चव्हाण (लेवल 3rd), श्रावणी क्षीरसागर (लेवल 5th), ईश्वरी पुराणिक (लेवल 6th).
कॉन्सोलेशन विजेते:- विवेक कांबळे, राजवीर परदेशी, अनन्या उबाळे, राजनंदिनी रणवरे, श्रेया दाभाडे, अद्वैत व्हटकर, ओम कुऱ्हे, आदित्य त्रिंबके, कार्तिक लावंडे, वेदिका पुराणिक, राणा होनराव.
फायनलिस्ट विद्यार्थी:- श्रीसाई गाडेकर, अवनी खेडकर, वैभवी गाडे, स्वरा माकोडे, स्वरा क्षीरसागर, आरुष नलवडे, प्रणिती माकोडे, मंथन बागडे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अमित कदम साहेब (गटविकास अधिकारी, पंचायत समिती करमाळा), शंभूराजे जगताप (संस्थापक, नामसाधना न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल, करमाळा), सौ. प्रफुल्लता सातपुते, थोरात मॅडम (मुख्याध्यापिका, जि. प. प्रा. शाळा वैद वस्ती, देवळाली), सौ. सुनंदा माने जाधव मॅडम (मुख्याध्यापिका, सेंट्रल स्कूल, करमाळा) आणि बिनवडे गुरुजी (सहशिक्षक, जि. प. प्रा. शाळा मारकड वस्ती, विहाळ) उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गणेश भाऊ करे पाटील (संस्थापक अध्यक्ष, यश कल्याणी सेवाभावी संस्था, महाराष्ट्र राज्य) लाभले होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने पालकांची उपस्थिती लाभली. यावेळी विद्यार्थ्यांनी सहा मिनिटांत 100 गणिते कशी सोडवतात याचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर केले. प्रमुख पाहुणे व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील यांनी पालकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आणि हेच विद्यार्थी भविष्यात महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त केला.
या प्रसंगी कमलाई क्लासेसच्या विद्यार्थिनी दीक्षा दत्तात्रय दिवटे तसेच भारतातील सर्वात लहान अबॅकस ग्रॅज्युएट ठरलेली विद्यार्थिनी सिद्धी पृथ्वीराज देशमुख यांना यश कल्याणी सेवाभावी संस्थेकडून प्रत्येकी ₹3000 ची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व गिफ्ट हॅम्पर देऊन गौरविण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या यशात मोलाचा वाटा असणाऱ्या पालकांचा ‘आदर्श पालक’ म्हणून सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन सौ. मंजुश्री मयूर मुसळे (संचालिका, कमलाई प्रो ऍक्टिव्ह क्लासेस, करमाळा), सौ. सारिका पुराणिक, श्रेया चव्हाण, श्रावणी क्षीरसागर, ईश्वरी पुराणिक, मधुरा मुसळे व मानव मुसळे यांनी उत्कृष्टरीत्या केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय शिंदे सर यांनी केले.


