Breaking
ब्रेकिंग

करमाळा एसटी आगारामध्ये काम करणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न

0 7 9 8 0 3

करमाळा एसटी आगारामध्ये काम करणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न

करमाळा: दि. ३०/ करमाळा येथील एसटी महामंडळ येथे काम करणारे कर्मचारी संगीता निंबाळकर, रशीद तांबोळी, जालिंदर मोहोळकर, तानाजी काटुळे, राजाभाऊ कुर्डे असे पाच कर्मचारी आज दिनांक 30/5/20२6 रोजी सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल करमाळा एसटी आगाराकडून या सर्वांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.

यावेळी करमाळा डेपोचे आगार व्यवस्थापक श्री शिवाजी कानडे साहेब, T. I. पंकज जाधव साहेब, बलभीम दैन, करमाळा एसटी महामंडळ आगारातील सर्व कर्मचारी, निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे परिवार, मित्र कंपनी इत्यादी उपस्थित होते.

यावेळी आगार व्यवस्थापक शिवाजी कानडे साहेब यांच्या हस्ते सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांचा हार, पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आगार व्यवस्थापक कानडे साहेब म्हणाले की, तुम्ही जरी निवृत्त झाला असला तरी तुमचे व करमाळा आगाराचे ऋणानुबंध कायम राहतील. तुम्हाला जेव्हा कधी आमची गरज पडेल तेव्हा आम्ही तुमच्या मदतीसाठी हजर असु तसेच, आम्हाला जेव्हा कधी तुमच्या अनुभवाची गरज पडेल तेव्हा नक्कीच आम्ही आपली आठवण काढू. याचबरोबर कानडे साहेब यांनी सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना सुखी व निरोगी आयुष्याच्या भरपूर शुभेच्छा दिल्या.

यावेळी निरोप समारंभा दरम्यान आपले मनोगत व्यक्त करताना सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांचे मन दाटून आले होते. सर्वांचे डोळे पाण्याने डबडबले होते.

या सेवापूर्ती सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बलभीम दैन यांनी केले. तसेच या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांनी तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांच्या परिवारातील व्यक्तींनी व करमाळा एसटी आगारातील कर्मचाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आज पर्यंत परिवारासाठी जगलात इथून पुढे स्वतःसाठी जगा.

उपस्थित सर्व मान्यवरांनी तसेच करमाळा एसटी आगारातील सर्व कर्मचारी व मित्र परिवारांनी निवृत्त सर्व कर्मचाऱ्यांना सुखी व निरोगी आयुष्याच्या भरपूर शुभेच्छा दिल्या.

5/5 - (2 votes)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 9 8 0 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे