Breaking
ब्रेकिंग

करमाळा येथे अधिकमासानिमित्त भव्य शिव महापुराण कथा सप्ताहाचे आयोजन

0 7 9 7 8 7

करमाळा येथे अधिकमासानिमित्त भव्य शिव महापुराण कथा सप्ताहाचे आयोजन

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ०९/ पवित्र अधिकमासाच्या निमित्ताने करमाळा शहरात भक्ती, अध्यात्म आणि संस्कारांची अनोखी पर्वणी अनुभवायला मिळणार असून 15 मे ते 21 मे या कालावधीत संत गजानन महाराज मंदिर एसटी कॉलनी श्री देवीचा माळ रोड करमाळा येथे भव्य शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती संत गजानन महाराज भक्त परिवार यांच्यावतीने श्रेणीक खाटेर व श्रीमती रंजना कुरलकर मॅडम यांनी दिली आहे. आदरणीय सुश्री स्नेहगंगा शृंगारे माई आळंदीकर यांच्या सुमधुर व प्रभावी वाणीतून होणाऱ्या या कथा सप्ताहामुळे संपूर्ण परिसर शिवमय वातावरणाने भारावून जाणार आहे.

शुक्रवार दि. १५ मे २०२६ ते गुरुवार दि. २१ मे २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत हा धार्मिक ज्ञानयज्ञ पार पडणार आहे. करमाळ्यातील श्री संत गजानन महाराज मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. शिवमहापुराणातील विविध प्रसंग, भगवान शंकरांचे चरित्र, भक्ती, अध्यात्म, संस्कार आणि जीवनमूल्यांचे प्रभावी निरूपण स्नेहगंगा शृंगारे माई आळंदीकर आपल्या अभ्यासपूर्ण शैलीतून करणार आहेत. त्यामुळे सात दिवस चालणारा हा कथा सप्ताह भाविकांसाठी आध्यात्मिक ऊर्जा देणारा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आयोजित नियोजन बैठकीत कार्यक्रम पत्रिका प्रकाशन व मंडप पूजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. मुख्य यजमान श्री. श्रेणिक खाटेर, सौ. संगीता खाटेर तसेच श्रीमती रंजना कुरलकर मॅडम यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. बैठकीत कथा सप्ताहाचे सुयोग्य नियोजन, मंडप व्यवस्था, भक्तांसाठी सुविधा, प्रसाद वितरण तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीच्या सदस्यांनी जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. यावेळी सर्वांनी तन-मन धनाने शिवपुराण महाकथा भव्य दिव्य स्वरूपात करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव भणगे, जगदीश शिगची तसेच सौ. कविता नीळ आटोळे मॅडम यांनी धार्मिक उपक्रम समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करतात, असे मत व्यक्त केले. अधिकमासाच्या पवित्र कालखंडात आयोजित कथा सप्ताहामुळे युवकांमध्ये संस्कार व समाजात ऐक्यभाव वाढीस लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दिनेश मुथ्था यांचा विशेष सत्कार करण्यात आला. हा सत्कार मुख्य यजमान श्री. श्रेणिक खाटेर यांच्या हस्ते करण्यात आला.

या नियोजन बैठकीस श्रेणिक खाटेर, रवींद्र विद्वत, जगदिश शिगची, प्रदीप देवी, नारायण पवार, सुरेश चव्हाण, कचरूशेठ मंडालेचा, अर्जुन गंधे, गणेश बोरा, शंकर रासकर, पत्रकार दिनेश मडके, विजय साळुंखे सर, दिनेश मुथ्था, ॲड. संकेत खाटेर, वर्धमान खाटेर, गिरीश शहा, बापू शिरगिरे, वैभव दोशी यांच्यासह महिला भगिनी सौ. संगिता खाटेर, सौ. स्वाती मसलेकर, सौ. छाया देवकर, वैशाली कोळी, सौ. रत्नमाला शिंदे, सौ. कमल चव्हाण, सौ, आशाबाई देशमुखे, सौ. संगीता गुंड, विना विद्वत, शिंदे काकू , चव्हाण आक्का, जिजी सातपुते, आडकर मॅडम, मनिषा कानडे, श्रध्दा जोशी, सौ. आरती बोकन, सोनु बोकन यांच्यासह भक्त परिवार, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 9 7 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे