Breaking
ब्रेकिंग

सीना कोळेगाव प्रकल्प विभाग कार्यालय परांड्यातच ठेवा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा:- सतीश निळ (सीना कोळेगाव धरणग्रस्त अध्यक्ष)

0 7 6 9 4 3

सीना कोळेगाव प्रकल्प विभाग कार्यालय परांड्यातच ठेवा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा:- सतीश निळ (सीना कोळेगाव धरणग्रस्त अध्यक्ष)

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ११/ सीना कोळेगाव धरणाचा पाणी साठा सीना कोळेगाव प्रकल्प विभाग परांडा या कार्यालयास हस्तांतरण करून हे विभागीय कार्यालय बंद न करता सुरू ठेवावे अशी मागणी सीना कोळेगाव धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सतीश नीळ यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे. श्री नीळ यांनी निवेदनात म्हटले आहे की, सीना कोळेगाव धरणाचा पाणी साठा सध्या पाटबंधारे विभाग क्र.१ धाराशिव या विभागीय कार्यालयाकडे आहे. सदरील कार्यालय परांडा येथून जवळपास ८० किमी अंतरावर असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ घेण्यासाठी व विविध प्रकारच्या परवानग्या मिळविणे साठी धाराशिव येथे जावे लागत आहे. हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत त्रास दायक आहे. त्यामुळे सदरील धरणाचा पाणी साठा सीना कोळेगाव प्रकल्प विभाग परांडा यांच्या कडे हस्तांतरण करून हे विभागीय कार्यालय कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात यावे व आम्हा सर्व धरणग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा. याकामी आपण आपल्या स्तरावरून सर्व सबंधित अधिकारी यांना आदेश द्यावेत अशी विनंती केली आहे.

श्री नीळ यांनी निवेदनात शेवटी म्हटले आहे की, आम्हा धरणग्रस्तांना न्याय न मिळाल्यास परांडा व करमाळा तालुक्यातील सर्वच धरणग्रस्त शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन सुरू केले जाईल असा इशारा दिला आहे.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे