गोरक्षनाथ गडावरून पायी दिंडीचे २५ जून ला प्रस्थान
२६ व २७ जून ला अहिल्यानगर शहरात दिंडी थांबणार

गोरक्षनाथ गडावरून पायी दिंडीचे २५ जून ला प्रस्थान
२६ व २७ जून ला अहिल्यानगर शहरात दिंडी थांबणार
प्रतिनिधी : संवेद वायकर
अहिल्यानगर येथून जवळच असणाऱ्या मांजरसुंबा येथील गोरक्षनाथ गडावरून सालाबादप्रमाणे दिनांक २५ जून रोजी श्री क्षेत्र गोरक्षनाथ गड ते पंढरपूर आषाडी दिंडी सोहळा प्रस्थान करणार असून दिंडीचे हे ४०वे वर्ष आहे
वैकुंठवासी बाळकृष्ण महाराज कदम यांनी प्रारंभ केलेली व राम महाराज पोते,वै . गोरक्षनाथ महाराज ढोकणे, भाऊसाहेब महाराज हरिचंद्रे व दिंडी सोहळा ट्रस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली गर्भगिरी डोंगर रांगेतील नगर तालुक्यातील मांजरसुंबा येथील श्रीक्षेत्र गोरक्षनाथ गड येथून २५ जून रोजी सकाळी 11 वाजता निघणार आहे,यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत
दिंडी सोहळ्यात दररोज पहाटे ४ ते ५ श्री पूजा व अभिषेक,पहाटे ५ते ६आरती व दर्शन दुपारी प्रवचन व रात्री कीर्तन नंतर दिंडी प्रवासात अखंड भजन होणार आहे दिंडी सोहळाचा पंढरपूर येथील मुक्काम श्री चैतन्य गोरक्षनाथ मंदिर,पंढरपूर टेंभुर्णी नाका,शिंदे नाईक मळा, पंढरपूर येथे राहणार आहे
दिंडी सोहळा गोरक्षनाथ गडावरून निघाल्यावर पहिला मुक्काम पिंपळगाव माळवी येथे राहणार असून दुसरा मुक्काम २६ जून ला नगर मधील सावेडीतील सहकारनगर मध्ये राहणार असून तेथील व्यवस्था माऊली कृपा मित्र मंडळ, यांनी केली आहे दि. २७ जून ला दिंडी सोहळा समतानगर येथे डॉ प्रकाश जाधव यांचे येथे सकाळचा नाश्ता घेणार असून रात्रीचा मुक्काम नगर तालुक्यातील दहिगाव येथे राहणार आहे तर दिनांक ३० जून रोजी चापडगाव येथे घोड्याचे रिंगण होणार आहे.पुढे करमाळा मार्गे पंढरपूरला हा सोहळा पोचणार आहे.द्वादशीला काल्याचा प्रसाद झाल्यानंतर दिंडी सोहळा विसर्जित होणार आहे
ओम चैतन्य गोरक्षनाथ दिंडी सोहळा ट्रस्ट कै दादासाहेब जाधव यांनी स्थापन केला असून नगर मध्ये दिंडीचे स्वागत डॉक्टर प्रकाश जाधव, एम बी धुमाळ करणार आहेत ज्यांना या दिंडी सोहळ्यात सहभागी व्हायचे त्यांनी गोरक्षनाथ गडावर दिनांक २५ जून रोजी सकाळी ११ वाजता हजर राहावे ,दिंडीत वारकऱ्यांनी पांढरा पोशाख परिधान करावा व शिस्त पाळावी,सहभागी होणाऱ्या वारकरी भक्तांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन अध्यक्ष भाऊसाहेब हरिश्चन्द्रे,सचिव राधाकिसन गांधले,उपाध्यक्ष सुभाष फुलारे,सहसचिव संभाजी गडाख ,भास्करराव कदम,खजिनदार ,गोरक्षनाथ गड देवस्थानचे अध्यक्ष एड शंकरराव कदम यांनी केले आहे
अधिक माहितीसाठी संपर्क राम महाराज पोते- ९८८१४४५८९२,किशोर महाराज गडाख ९९६०४७९९०९ डॉ. प्रकाश दादासाहेब जाधव- ९५५२०९३२२९, , भास्करराव कदम- ९७६७४९३३८४ , सिमाजी तांबे -९७६७४९३३७५ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे