Breaking
ब्रेकिंग

शेलगाव क येथील आरोग्य शिबिराचा 260 लाभार्थ्यांनी घेतला लाभ

0 7 6 9 4 3

शेलगाव क येथील आरोग्य शिबिराचा 260 लाभार्थ्यांनी घेतला लाभ

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १४/ शेलगाव क, ता. करमाळा येथे ग्रामदैवत नागनाथ महाराज यात्रेनिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यामध्ये प्रामुख्याने दि. 11 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य शिबिर 12 ऑगस्ट रोजी कुस्ती आखाडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. याप्रसंगी आयोजित आरोग्य शिबिराचा लाभ 260 लाभार्थ्यांनी घेतला. त्यामध्ये 40 वर्ष वयोगटाच्या पुढील 178 रुग्णांचे डोळे तपासून त्यांना चष्मे वाटप करण्यात आले. ज्या रुग्णांचे मोतीबिंदूंचे ऑपरेशन करणे गरजेचे आहे त्यांच्यासाठी ऑपरेशन ची तारीख देण्यात आली.

याप्रसंगी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 71 रक्तदात्यांनी रक्तदान केले. हे आरोग्य शिबिर मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे चॅरिटेबल हॉस्पिटल करमाळा यांच्यावतीने आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये एच. व्ही. देसाई नेत्र रूग्णालय, महंमदवाडी, हडपसर, पुणे, सुविधा हॉस्पिटल बार्शी, सुश्रुत हॉस्पिटल बार्शी, उपजिल्हा रूग्णालय, करमाळा व मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे चॅरिटेबल हॉस्पिटल करमाळा डॉ. ओंकार उघडे यांनी सहभाग घेतला. हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रदीप बनसोडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे