Breaking
ब्रेकिंग

बेकायदेशीर टर्फ विरोधात आम आदमी पार्टी चे धरणे आंदोलन

0 7 6 9 3 2

बेकायदेशीर टर्फ विरोधात आम आदमी पार्टी चे धरणे आंदोलन

प्रतिनिधी: राजेश बाष्टे

अलिबाग: दि. २९/ खोपोली नगरपरिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ६ येथील शाळेसमोरील मैदानावर खोपोली नगरपरिषद मार्फत क्रिकेटचे टर्फ बनवण्याचे काम सुरू आहे. सदर मैदानावरून टाटा पावर कंपनीची व मध्य रेल्वेची एक लाख दहा हजार व्होल्टची उच्च दाबाची विद्युत वाहिनी जात असून सदर टर्फ बनवण्याकरिता टाटा पॉवर व मध्य रेल्वेची कोणतीही परवानगी नगर परिषदेने घेतलेली नाही. सदर टर्फ बेकायदेशीर आहे व त्याकरिता नगर परिषदेने खर्च केलेले सर्व पैसे हे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. पंकज पाटील यांच्या कडून वसूल करण्यात यावे अशी मागणी आम आदमी पार्टी तर्फे खोपोली शहर अध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी केलेली आहे.

नागरिकांच्या कराच्या पैशांचा गैरवापर केल्याबद्दल खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांना बडतर्फ करण्यात यावे त्याकरिता आम आदमी पार्टी आक्रमक झालेली असून गुरुवार दिनांक 31 जुलै 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे असे आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉ. पठाण यांनी सांगितले.

5/5 - (2 votes)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 3 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे