Breaking
ब्रेकिंग

पाझर पाईप निचरा प्रणलीचा वापर करावा:- देवा फलफले

0 7 9 8 0 6

पाझर पाईप निचरा प्रणलीचा वापर करावा:- देवा फलफले

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ११/ करमाळा तालुक्यातील टाकळी येथे बॅक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण विकास केंद्र भिगवण यांच्या तर्फे शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणुन देवा फलफले हे उपस्थित होते. अति पाणी व बेसुमार रासायनिक खतामुळे जमिनीची क्षारपड झाली असून शेती नापीक झाली आहे. यामुळे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पाझर पाईप निचरा प्रणलीचा वापर करुन शेतीमध्ये उत्पादन वाढवावे असे आवाहन देवा फलफले यांनी केले. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र बॅकेचे उमेश निकम, माती परीक्षणचे पोपट लकडे, चेअरमन लतिश लकडे पाटील, सोमनाथ गुळवे, सोमनाथ तावरे, बापु जाधव आदिसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना म्हणाले की, टाकळी परिसरातील व गावातील शेतकऱ्याची शेती मोठ्या प्रमाणात नापीक झाली आहे. हे थांबवणे आपल्याला शक्य आहे यासाठी उघड्या डोळ्याने फक्त न पाहता उपाययोजना मार्गदर्शनाखाली करणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी पोपट लकडे यांनी माती परीक्षण यावर महिती दिली तर उमेश निकम यांनी बॅक ऑफ महाराष्ट्र व ग्रामीण विकास केंद्र यांचा विविध योजनेची महिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकुंश कोकाटे यांनी केले तर आभार सोमनाथ कुचेकर यांनी मानले. कार्यक्रमास गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रासायनिक शेती मुळे जमिनी नापीक व क्षारपड झाल्याने उत्पादन घटले आहे. त्यामुळे अपेक्षीत उत्पन्न न मिळाल्याने शेतकऱ्याची शेती तोट्यात चालली आहे. हे टाळणे साठी आधुनिक शेतीचा वापर करणे बरोबर पाझर पाईप निचरा प्रणालीचा वापर करणे काळाची गरज आहे.

देवा फलफले:- कृषीसहाय्यक महाबॅक ग्रामीण विकास केंद्र, भिगवण.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 9 8 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे