करमाळा एस.टी आगाराचे कर्मचारी रशीद तांबोळे यांचा सेवापुर्ती सन्मान सोहळा संपन्न: पी.एस.आय. सुधीर गायकवाड यांनी दिल्या शुभेच्छा

करमाळा एस.टी आगाराचे कर्मचारी रशीद तांबोळे यांचा सेवापुर्ती सन्मान सोहळा संपन्न: पी.एस.आय. सुधीर गायकवाड यांनी दिल्या शुभेच्छा

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ३०/ करमाळा एस.टी आगारात कार्यरत असलेले कर्मचारी रशीद तांबोळी हे आज दि. 30/5/2016 रोजी सेवानिवृत्त झाले. यावेळी पीएसआय सुधीर गायकवाड यांच्या हस्ते त्यांचा हार, गुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला. यावेळी पीएसआय गायकवाड यांनी रशीद तांबोळी यांना निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
रशीद तांबोळी हे 16/2/1988 साली एस टी महामंडळ करमाळा येथे कार्यरत झाले होते. 38 वर्ष त्यांनी एस टी महामंडळ मध्ये आपले कर्तव्य बजावले. यादरम्यान बार्शी डेपोत दहा वर्षे त्यांनी नोकरी केली. आयुष्यामध्ये त्यांना अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. सेवानिवृत्तीच्या काही दिवस अगोदर त्यांचे शारीरिक स्वास्थ्य साथ देत नसताना देखील त्यांनी आपली सेवा पूर्ण केली. तांबोळी यांनी नेहमी सर्व कर्मचाऱ्यांशी हसतमुखाने, आपुलकीने, मैत्रीपूर्ण संबंध जोपासले.
यावेळी पीएसआय गायकवाड, हनुमंत बिनवडे, समीर तांबोळी, जाधव, अमजद पठाण, महाराज, शहाजी वीर, करमाळा आगारातील एसटी कर्मचारी, तांबोळी यांचे मित्रपरिवार इं. उपस्थित होते. सर्वांनी रशीद तांबोळी यांना सुखी व निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.


