Breaking
ब्रेकिंग

दत्तकला इंजिनिअरिंगचे प्रा. विजयसिंग राठोड यांना पीएच. डी. पदवी प्रदान

0 7 9 8 0 2

दत्तकला इंजिनिअरिंगचे प्रा. विजयसिंग राठोड यांना पीएच. डी. पदवी प्रदान

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २७/ दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला इंजिनिअरिंग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक प्रा. विजयसिंग राठोड यांना छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठा मार्फत पी.एच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. प्रा. राठोड यांनी “व्हर्च्युअल डिझाइन सिस्टीम ऑफ कंपाऊंड डाय इन प्रेस वर्किंग ऑपरेशन” या विषयावर संशोधन कार्य पूर्ण करून यशस्वीरित्या शोधनिबंध सादर केला. त्यांच्या संशोधनामध्ये प्रेस वर्किंग ऑपरेशनमधील कंपाऊंड डाय डिझाईन प्रक्रिया अधिक कार्यक्षम, अचूक व वेळेची बचत करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. हे संशोधन औद्योगिक उत्पादन प्रक्रियेस उपयुक्त ठरणारे मानले जात आहे. या संशोधन कार्यासाठी त्यांना मार्गदर्शक डॉ. रविकुमार संगेवार व डॉ. नंदकिशोर सवई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या उल्लेखनीय यशाबद्दल दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ व सचिवा माया झोळ यांनी प्रा. राठोड यांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर, दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. श्रीकांत साळुंके, प्राचार्य डॉ. संभाजी पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रा. राठोड यांच्या या यशामुळे दत्तकला इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील कार्याला नवी उंची प्राप्त झाली असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. तसेच प्रा. राठोड यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 9 8 0 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे