Breaking
ब्रेकिंग

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज आणि परिवार यांच्या६७५ व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह

0 7 6 9 3 7

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज आणि परिवार यांच्या६७५ व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २३/ श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराज आणि परिवार यांच्या६७५ व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त मंगळवार दिनांक २२.०७.२०२५ रोजी सकाळी १० ते १२ वा. पर्यंत काल्याचे किर्तन ह.भ.प. बळीराम महाराज वायकर. रा. पाडळी यांचे झाले आहे. श्री संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली.

श्री संत नामदेव आणि परिवार यांच्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त करमाळा अर्बन बँक संचालक पदी निवड झाल्याबद्दल श्री. चंद्रकांत चुंबळकर यांचा सत्कार शिंपी समाजाचे अध्यक्ष रवींद्र वनारसे यांनी केला. तसेच चंद्रकांत चुंबळकर यांची श्री संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शशिकांत वनारसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. करमाळा नगरपालिकेचे अधिकारी श्री कविटकर साहेब यांचा सत्कार श्री संत नामदेव शिंपी समाजाचे विश्वस्त श्री पांडुरंग गाठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच श्री. पुजारी साहेब करमाळा नगरपालिका आरोग्य अधिकारी यांचा सत्कार करमाळा शिवसेना (श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उपप्रमुख श्री संतोष गानबोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री पांडुरंग वडे यांचा सत्कार श्री रामचंद्र बोधे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आला. श्री अशोक गाठे यांचा सत्कार शिंपी समाजाचे जेष्ठ विश्वस्त श्री यशवंतराव (भाऊ) गानबोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सौ वैशाली वडे यांचा सत्कार सौ. वनारसे यांच्या हस्ते करण्यात आला. सौ. संगीता वनारसे यांचा सत्कार सौ. चुंबळकर यांच्या हस्ते करण्यातआला.

यानंतर महाप्रसाद श्रीखोलेश्वर मंदिर महादेव मंदिर समोर किल्ला विभाग मा. जयवंतराव नामदेवरावजी जगताप सभागृह येथे श्री रामचंद्र बोधे, श्री रवींद्र बोधे परिवार यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. श्री रामचंद्र बोधे व श्री रवींद्र बोधे परिवार यांचा सत्कार श्री संजय पिसे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी एक विशेष सत्कार २४ जून २०२५ रोजी अहिल्यानगर ते करमाळा एसटी प्रवास करीत असताना शॉर्टसर्किटमुळे एसटीने पेट घेतला असल्याचे शिंपी समाजातील एक चिमुकला चि. देवांश रूपाली सागर वडे यांच्या लक्षात आल्याने त्याने एसटी ड्रायव्हरला ड्रायव्हर काका डायव्हर काका गाडीला आग लागली आहे असे ओरडून सांगितल्याने व प्रसंगावधानामुळे कोणतीही मनुष्य जीवित हानी झाली नाही यामुळे मोठा अनर्थ टळला. या धाडसा चे कौतुक म्हणून शिंपी समाजामार्फत त्याचा सत्कार करण्यात आला‌ तसेच श्री सागर वडे यांनी गेली आठ दिवस श्री संत नामदेव महाराज आणि परिवार यांच्या संजीवनी समाधी सोहळा निमित्त तन मन आणि धनाने सर्व ते जबाबदारी यशस्वी पार केल्याबद्दल त्याचा सत्कार श्री विजयकुमार माळवदकर व श्री राजेंद्र गानबोटे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच कै. अजिनाथ रंगनाथ गाठे यांच्या स्मरणार्थ २०२६ चा श्रीसंत नामदेव महाराज आणि परिवारांच्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचा आयोजन श्री प्रशांत गाठे आणि श्री प्रवीण गाठे यांच्यामार्फत करण्यात येत असल्यामुळे त्यांचाही सत्कार समाजामार्फत करण्यात आला.

श्री नामदेव महाराज शिंपी आणि परिवार यांच्या संजीवनी सोहळ्यानिमित्त कीर्तन व महाप्रसादाचा लाभ सर्व समाज बांधवांनी घेतला. या कार्यक्रमानिमित्त सर्वच शिंपी समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

श्री संत नामदेव महाराज शिंपी समाज करमाळा

5/5 - (2 votes)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 3 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे