कृष्णाजी नगर बनले घाणीचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात; पालिकेची बघ्याची भूमिका !
कृष्णाजी नगर बनले घाणीचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात; पालिकेची बघ्याची भूमिका !
प्रतिनिधी: सूर्यकांत होनप
करमाळा: दि. ०४/ करमाळा शहरातील कृष्णाजी नगर येथे ठिकठिकाणी पाण्याचे ढव साठलेले आहेत. कृष्णाजी नगर येथील बागेमध्ये तर पाण्याचे तळेच झालेले आहे. ठिकठिकाणी गाळ कचरा पडलेला आहे. त्यामुळे कृष्णाजी नगर येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. रस्त्यावरून तर पाण्याचा ओढा वाहत आहे. शाळेत जाणाऱ्या शाळकरी मुलांना याचा प्रचंड त्रास होत आहे. लहान मुले शाळेत जाताना त्या पाण्यात व चिखलात घसरून पडतात येथील नागरिक ही तिथल्या साचलेल्या पाण्यामुळे व चिखल्यामुळे सतत घसरून पडत असतात. तरी शाळकरी मुलांना किंवा इतर रहिवाशांना काही इजा झाल्यास त्यास जबाबदार कोण असा जाब राजू नगर येथील रहिवाशांनी करमाळा नगरपालिका विचारला आहे.
कृष्णाजी नगर येथील रहिवाशांची नेहमीच तक्रार असते की तेथे नगरपालिका कधीही स्वच्छतेकडे लक्ष देत नाही. दरवेळी नगरपालिका यांना तक्रार केली तरीदेखील नगरपालिका कृष्णजी नगर येथील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. तेथे जाऊन स्वच्छता करत नाहीत. कृष्णाजी नगर येथील रहिवाशांना वर्षानुवर्ष हा त्रास सहन करावा लागत आहे. आजही जागोजागी साठलेले पाणी, कचरा तुंबलेल्या गटारी या सर्व बाबी नगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिलेला आहेत, परंतु अद्यापही नगरपालिकेकडून कुठलीही मदत तेथील रहिवाशांना मिळत नाही किंवा तेथे नगरपालिकेने कोणालाही स्वच्छता करण्यास पाठवलेले नाही.
कृष्णाजी नगर मधील रहिवाशांनी नगरपालिकेचे C.O. यांना देखील सर्व परिस्थिती दाखवलेली आहे तरी देखील अजूनही नगरपालिकेकडून कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही, त्यामुळे कृष्णाजी नगर येथील रहिवाशांना या घाणीमुळे घाणीच्या साम्राज्यामुळे आजारांना सामोरे जावे लागत आहे. मच्छरांचे तर प्रचंड प्रमाण वाढलेले आहे. मच्छरांच्या वाढत्या प्रमाणामुळे डेंगू मलेरिया सारख्या आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. तरीदेखील नगरपालिका याकडे दुर्लक्ष करीत आहे.
कृष्णाजी नगर येथील रहिवाशांचे या घाणीच्या साम्राज्यामुळे आरोग्य धोक्यात आलेले आहे. जर या घाणीमुळे व मच्छरांमुळे काही जीवित हानी झाल्यास किंवा नागरिकांना मोठ्या आजारास सामोरे जावे लागल्यास त्यास जबाबदार कोण असेल हा प्रश्न कृष्णाजी नगर येथील रहिवाशांनी केला आहे. कृष्णाजी नगर येथील नागरिकांना जर काही जीवित हानी झाली तर त्यास संपूर्णपणे करमाळा नगरपालिका ही जबाबदार असेल कारण वारंवार नगरपालिकेच्या निदर्शनास कृष्णाजी नगर येथील घाण कचरा व मच्छरां विषयीचे प्रश्न उपस्थित करून सुद्धा करमाळा नगरपालिकेने दुर्लक्ष केलेले आहे. अजूनही तेथील रहिवाशांना कुठलीही मदत मिळालेली नाही तरीदेखील येथील रहिवाशांना काही जीवित हानी झाल्यास त्याला संपूर्णपणे जबाबदार करमाळा नगरपालिका असेल. तरी करमाळा नगरपालिकेने तातडीने लवकरात लवकर कृष्णाजी नगर येथील स्वच्छतेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा व येथील घाण व मच्छर याचे कायमस्वरूपी निर्मूलन कसे होईल याविषयी उपायोजना कराव्यात. करमाळा नगरपालिकेने कृष्णजी नगर येथे स्वच्छता करून फिनेल, पावडर मारून सर्व परिसर स्वच्छ करावा. तसेच कृष्णा नगर येथील बागेमध्ये साठलेल्या पाण्याची विल्हेवाट लावावी, अन्यथा करमाळा नगरपालिकेला कृषी नगर येथील रहिवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असे कृष्णाजी नगर येथील रहिवासी म्हणत आहेत.



