Breaking
ब्रेकिंग

सुहास गलांडे सर जिल्हा इंग्रजी अध्यापक संघाच्या ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित

0 7 6 9 4 3

सुहास गलांडे सर जिल्हा इंग्रजी अध्यापक संघाच्या ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २४/ सोलापूर जिल्हा इंग्रजी अध्यापक संघाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘आदर्श इंग्रजी शिक्षक’ पुरस्कार यंदा गिरधरदास देवी विद्यालयाचे शिक्षक श्री. सुहास गलांडे सर यांना प्रदान करण्यात आला. विद्यार्थीकेंद्रित अध्यापन, नाविन्यपूर्ण शिक्षणपद्धती आणि इंग्रजी विषयाच्या गुणवत्तावृद्धीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.

श्री वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थान, अक्कलकोट येथे पार पडलेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संपतराव शिंदे पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून देवस्थानचे चेअरमन महेश मालक इंगळे, डॉ. गणेश करे पाटील, डॉ. प्रचिती पुंडे, आत्माराम घाटगे, प्रा. बाळकृष्ण लावंड, देवी विद्यालय संस्था प्रमुख सुनीता देवी, गुरुनाथ मुचंडे, अश्पाक काझी, यांची उपस्थिती लाभली. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांनी सातत्याने अद्ययावत राहून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याची गरज अधोरेखित केली.

श्री. गलांडे यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत त्यांच्या अध्यापनातील नावीन्य आणि बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. सन्मान स्वीकारताना श्री. सुहास गलांडे यांनी हा पुरस्कार जबाबदारीची जाणीव अधिक दृढ करणारा आहे असे मत व्यक्त करून यापुढे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अधिक समर्पितपणे कार्य करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल श्री. सुहास गलांडे यांचे श्री गिरधरदास देवी प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री कन्हैयालाला देवी, सचिव अमोदशेठ संचेती, संचालिका सौ. सुनीता देवी संचालक विजयकुमार दोशी, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री संभाजी जगताप सर्व शिक्षक शिक्षकेतर, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

या कार्यक्रमास जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षणप्रेमी व विविध क्षेत्रातील मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे