Breaking
ब्रेकिंग

शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुख पदी पत्रकार तुषार जाधव यांची निवड

0 7 6 9 4 3

शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुख पदी पत्रकार तुषार जाधव यांची निवड

प्रतिनिधी: सूर्यकांत होनप

करमाळा: दि. ०४/ शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुख पदी पत्रकार तुषार जाधव यांची निवड करण्यात आली. सदर निवड ही एका पत्रकारा द्वारे जिल्हाप्रमुख अमित पाटील यांनी केली आहे. वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्यनेते उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार, खासदार मा. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब, शिवसेना उपनेते शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना राज्य प्रमुख मा. राहुल कनाल व उपराज्यप्रमुख मा. प्रतिक दादा शर्मा, शिवसेना सोशल मीडिया सोलापूर जिल्हाप्रमुख अमित पाटील यांच्या शिफारसीनुसार ही निवड करण्यात आली.

निवडी नंतर जाधव म्हणाले की शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचारानुसार महाराष्ट्रात आज जे विकासाभिमुख आणि लोकाभिमुक प्रशासन राबत आहे. तो विचार संपूर्ण महाराष्ट्रात व सोलापूर जिल्ह्यात पोहोचवण्याची जबाबदारी पाळेल व पक्षाचे काम तन मन धनाने करेल असे नवनिर्वाचित अध्यक्ष जाधव यांनी बोलताना सांगितले. तसेच या निवडीनंतर सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीद्वारे जाधव यांना शुभेच्छा दिल्या, तसेच सोशल मीडिया द्वारे शुभेच्छा देण्यात आल्या असून जाधव यांच्या निवडीचे स्वागत करमाळा तालुक्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी केले आहे.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे