Breaking
ब्रेकिंग

जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल गणेश चिवटे यांची दिवेगव्हाण येथे हत्तीवरून मिरवणूक

0 7 6 9 4 3

जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल गणेश चिवटे यांची दिवेगव्हाण येथे हत्तीवरून मिरवणूक

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २४/ नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वीट जिल्हा परिषद गटातून सौ. अश्विनी गणेश चिवटे यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळविला. या दणदणीत यशानंतर तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून दिवेगव्हाण येथे गणेश चिवटे यांची चक्क हत्तीवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. दिवेगव्हाण येथील शिवगर्जना दूध संकलनाचे सर्वेसर्वा ईश्वर मोरे यांच्या पुढाकारातून या अनोख्या विजय मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सजवलेल्या हत्तीवर बसवून गणेश चिवटे यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. हलगी, बॅन्जोच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या मिरवणुकीने करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात विशेष चर्चा रंगली आहे. मिरवणुकीनंतर विजयी सभेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी युवा नेते अभिषेक मोरे, निलचंद दुरंदे, भाजपाचे ज्येष्ठ नेते संजय घोरपडे, भगवान गिरी गोसावी यांनी भाषणे करत गणेश चिवटे यांच्या नेतृत्वगुणांचे व विकासाभिमुख कार्यपद्धतीचे कौतुक केले.

आपल्या मनोगतात गणेश चिवटे म्हणाले की “तालुक्यात विक्रमी मताधिक्याने विजय मिळाल्यानंतर ईश्वरकाका मोरे यांनी प्रेमापोटी काढलेली ही मिरवणूक माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. या ऋणातून उतराई होण्यासाठी वीट जिल्हा परिषद गटासह दिवेगव्हाण आणि तालुक्यातील इतर गावांच्या विकासासाठी मी अधिक ताकदीने प्रयत्न करेन.” ते पुढे म्हणाले की, मी जरी वीट जिल्हा परिषद गटातून विजयी झालो असलो तरी, संपूर्ण तालुक्यात विकासकामे करण्याचा माझा प्रयत्न राहील. मिरवणुकीबद्दल त्यांनी ईश्वर मोरे व दिवेगव्हाण ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानले आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले.

गणेशभाऊ चिवटे यांचा विजय हा केवळ निवडणुकीचा निकाल नाही, तर विकासाच्या राजकारणावर आमचा विश्वास आहे. त्यांनी केलेल्या कामांची जाणीव ठेवूनच आम्ही त्यांचा सन्मान हत्तीवरून मिरवणूक काढून केला. हे आमच्या प्रेमाचे आणि ठाम पाठिंब्याचे प्रतीक आहे.

           ईश्वर मोरे:- आयोजक, दिवेगव्हाण.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे