ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती व समिती अध्यक्ष सुरेश पालकर यांनी रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक आॕंचल दलाल यांची घेतली सदिच्छा भेट
ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती व समिती अध्यक्ष सुरेश पालकर यांनी रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक आॕंचल दलाल यांची घेतली सदिच्छा भेट
प्रतिनिधी: राजेश बाष्टे
अलिबाग: दि. २७/ रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक आॕंचल दलाल यांची जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीने अध्यक्ष सुरेश पालकर यांच्या नेत्रुत्वाखाली सदिच्छा भेट घेतली. प्रारंभी समन्वय समिती अध्यक्षांनी बुके देऊन पोलिस अधिक्षक यांचे स्वागत केले. त्यानंतर पो. अ. दलाल मॕडम यांनी रायगड जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ज्येष्ठ नागरिक संस्था व त्यांचे कामकाज याविषयी माहिती जाणून घेतली.
ज्येष्ठ नागरिक हा समाजातील महत्त्वाचा घटक असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांशी संपर्क ठेवणे गरजेचे आहे म्हणून दर २ महिन्यांनी पोलिस अधिक्षक कार्यालयात ज्येष्ठ नागरिक संघ प्रतिनिधींची बैठक घ्यावी. जे ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात त्यांची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात असावी व संकट प्रसंगी त्यांना संरक्षण द्यावे. रात्री अपरात्री औषधोपचारासाठी त्यांना मदत व्हावी तसेच सायबर गुन्हेगारीबाबत मार्गदर्शन द्यावे इ. विषयांंवर मनमोकळेपणे चर्चा झाली.
शेवटी समन्वय समिती अध्यक्ष सुरेश पालकर यांनी पो. अ. दलाल मॕडम यांचे आभार मानले. यावेळी समन्वय समिती अध्यक्ष सुरेश पालकर, उपाध्यक्ष अविनाश म्हात्रे, खजिनदार काशिनाथ पिंगळे, ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर, अलिबागचे ना. संस्थाध्यक्ष प्रफुल्ल राऊत, उपाध्यक्षा चारुशीला कोरडे, आर्. के. घरत इ. उपस्थित होते.