करमाळा दत्तक घेणार; महीन्यात दोन कोटी निधी आणणार:- पालकमंत्री मा. जयकुमार गोरे
सुनीता देवींना नगराध्यक्ष करा करमाळा नगरपालिका दत्तक घेऊ:- पालकमंत्री मा. जयकुमार गोरे
प्रतिनिधी: सूर्यकांत होनप
करमाळा: दि. २९/ करमाळा नगरपालिका निवडणूक व प्रचार रंगतदार वळणावर आलेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या काल झालेल्या प्रचार सभेतील पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे भाषण लक्षवेधी ठरले.
यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले करमाळा शहराचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर भाजपचे सर्व उमेदवार निवडून द्या. करमाळा शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. करमाळा शहराच्या सर्व समस्या सर्व प्रश्न आपण मार्गी लावू. करमाळा नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकल्यास अवघ्या दोन महिन्यात करमाळा नगरपालिकेस भरघोस निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी कर्मा शहरातील जनतेला दिले आहे. एवढेच नव्हे तर करमाळा नगरपालिका आपण दत्तक घेऊन असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले. तसेच मी कधीही कुठली खोटी आश्वासने देत नाही, माझा इतिहास काढून बघा मी जे बोलतो ते काम पूर्ण करून दाखवणार असे यावेळी ते म्हणाले.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, रश्मी दीदी बागल, विलासराव घुमरे सर, दिग्विजय बागल, कन्हैयालाल देवी, गणेश चिवटे, जगदीश अग्रवाल तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



