शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी केलेले उपोषण स्थगित; पुढील एक महिना खोपोली शहरातील सर्व शाळांचे निरीक्षण करणार:- आ.प

शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी केलेले उपोषण स्थगित; पुढील एक महिना खोपोली शहरातील सर्व शाळांचे निरीक्षण करणार:- आ.प
प्रतिनिधी: राजेश बाष्टे
खोपोली: दि. २७/ खोपोली नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक सहा येथील शाळेच्या मैदानासमोर नगर परिषदेमार्फत बनवण्यात येणाऱ्या कृत्रिम टर्फ मुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना इतर खेळ खेळण्याकरिता जागा शिल्लक राहणार नाही त्याकरिता आम आदमी पार्टी तर्फे खोपोली नगरपरिषद समोर मंगळवार दिनांक 24 जून 2025 रोजी पासून तीन दिवस उपोषण करण्यात आले होते. सदर टर्फ चे काम 70% पूर्ण झालेले आहे व आता काम थांबवणे अशक्य आहे असे नगर परिषदेचे म्हणणे आहे व शासकीय कामात अडथळा आणू नये असे बोलून नगर परिषदेने आपल्यावरील जबाबदारी झटकलेली आहे. सदर मैदानातून टाटा पॉवरची उच्च दाबाची विद्युत वाहिनी जात असून लोखंडी खांबामुळे एखाद्या विद्यार्थ्याला विजेचा झटका लागल्यास जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे. तसेच शाळेच्या मुख्याध्यापकांनी माघार घेतल्यामुळे व सदर आंदोलनाला काही समाजकंटकांमार्फत जातीय रंग देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे समाज हिताकरिता आम आदमी पार्टी सदर लढा हा संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून न्यायालयामार्फत लढणार असे आम आदमी पार्टी खोपोली शहर अध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी सांगितले.
आम्ही मुलांना त्यांचा हक्क मिळून देण्यासाठी प्रयत्न केला, प्रशासनाबरोबर लढलो, संविधानिक मार्गाने उपोषण केले, तरी तूर्तास आम्ही उपोषण स्थगित करत असून पुढील एक महिना आम्ही खोपोली शहरातील सर्व शाळांचे निरीक्षण करणार व शिक्षणासाठी आमचा हा लढा पुढेही चालू राहणार असे आपचे प्रदेश संघटन सचिव डॉ. पठाण यांनी सांगितले.
सदर उपोषणाला आम आदमी पार्टीचे वरिष्ठ नेते कस्तुरचंद राठोड, शहर सचिव चंद्रप्रकाश उपाध्याय, शहर उपाध्यक्ष विवेक वाघमारे, भगवान पवार, मिस्त्री, धर्मेंद्र चव्हाण यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.