Breaking
ब्रेकिंग

श्री रोहन टोणपे रोटरी शाश्वत शेती गौरव पुरस्कार 2025 ने सन्मानित

0 7 6 9 4 3

श्री रोहन टोणपे रोटरी शाश्वत शेती गौरव पुरस्कार 2025 ने सन्मानित

प्रतिनिधी: सूर्यकांत होनप

करमाळा: दि. ०९/ रोटरी शाश्वत शेती गौरव पुरस्कार प्रगतशील शेतकरी 2025 ने रोहन टोणपे यांना सन्मानित करण्यात आले. श्री टोणपे यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग करून कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग केला. याची दखल घेऊन रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी पुणे यांचे वतीने इंदापूर कालठण नं. 1येथे 9 नोव्हेंबर रोजी झालेल्या शाश्वत शेती कार्यशाळा व प्रदर्शन या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी पुणे चे विद्यमान अध्यक्ष भरत चव्हाण, माजी अध्यक्ष गोविंद जगदाळे सुभाषभाऊ वाल्हेकर, जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ शिराळ चे संस्थापक अध्यक्ष श्री नंदकुमार टोणपे, जयप्रकाश जाधव, संस्थेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, शिराळ अंबड गावातील नागरिक व मित्रपरिवार तसेच शाश्वत शेती व तज्ञ प्रमुख मार्गदर्शक प्रमोद जेजुरीकर, राजेंद्र सराफ, मनोहर खके, संतोष लाटणेकर, रवींद्र बनसोड, भास्कर गटकुळ, रोटरी क्लब ऑफ इंदापूर, बारामती, दौंड, भिगवन, वाल्हेकरवाडी पुणे येथील बहुसंख्य रोटरी क्लबचे सदस्य तसेच परिसरातील शेतकरी बहुसंख्येने हजर होते.

श्री टोणपे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे