Breaking
ब्रेकिंग

करमाळा शहरामध्ये हिंदू मुस्लिम बांधवांच्या सहभागाने मोहरम उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार:- शौकत नालबंद अध्यक्ष मोहरम कमिटी करमाळा

0 4 3 5 8 9

करमाळा शहरामध्ये हिंदू मुस्लिम बांधवांच्या सहभागाने मोहरम उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार:- शौकत नालबंद अध्यक्ष मोहरम कमिटी करमाळा

 

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ३०/ करमाळा शहरांमध्ये हिंदू मुस्लिम बांधवाचे एकात्मतेचे दर्शन घडवणारी सवारी पंजेची स्थापना करून मोहरमचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मोहरम कमटीचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद यांनी दिली. करमाळा शहरामध्ये एकूण 14 सवाऱ्या सहा डोलेची स्थापना होत असून करमाळा शहरामध्ये प्रामुख्याने मानाची सवारीची स्थापना दिनांक 27 जून रोजी किल्ला वेस येथे झाली असून, मंगळवार दिनांक एक जुलै रोजी उर्वरित तेरा सवाऱ्यांची व सहा डोल्याची स्थापना होणार आहे.

इमाम कासम सवारी, मोहीद्दीन तालीम पंच जाकीर हाशिम वस्ताद यांची सवारी, अल्लाउद्दीन सवारी कुंभार वाडा पंच राजेंद्र परदेशी, नाले हैदर सवारी खाटीक गल्ली पंच बिलाल कुरेशी, लालन सवारी भवानी पेठ पंच मोहम्मद शरीफ शेख, नाले हैदर सवारी मोहल्ला गल्ली पंच हाजी समीर शेख, पाच पंजे मौलाली सवारी पंच शंकर हवालदार, अल्लाउद्दीन सवारी रंभापुरा पंच बबन दुधाट, अल्लाउद्दीन सवारी सुमंतनगर पंच दादा अडसूळ, नाले हैदर सवारी खडकपुरा पंच पोपट माहुले, नाले हैदर सवारी मोलाली माळ पंच सलीम मदारी, बारा इमाम सवारी पंच जमाल सय्यद, इमाम सवारी कसाब गल्ली फारुक कुरेशी, इमाम कासम सवारी पंच सलीम मदारी ताजे डौले आघाडीवाला ताज्या पंच तैमुर सय्यद, पांढरी ताजा दिलावर मुलाणी, सुमंतनगर ताजा पंच गणेश जाधव, खाटीक गल्ली ताजा पंच कासद कुरेशी, गवंडी गल्ली ताजा पंच जाकीर राज, कुंभार वाडा पंच आलमगीर सय्यद, यांच्या वतीने स्थापना होणार आहे.

मोहरम कमिटीच्या उत्सवाच्या मिटींगकरीता हाजी नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी उपनगराध्यक्ष, अहमदचाचा कुरेशी, अ़ॅड. नईम काझी, सकल मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जमीर सय्यद, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष आझाद भाई शेख, अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारुकभाई जमादार, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष समीर शेख, रहिनुमा चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव सुरज शेख, राष्ट्रवादी शहराध्यक्ष सोहेल पठाण, सारंग परदेशी, सागर परदेशी, जिशान कबीर, मुस्तकीम पठाण, इम्तियाज पठाण, भाजप शहर उपाध्यक्ष राजू सय्यद, हाजी उस्मान सय्यद, जाफर घोडके, इस्माईल सय्यद, सलमान घोडके, शहानुर कुरेशी, अमर शेख, अकबर बेग, अकबर सय्यद जावेद मणेरी, फिरोज मणेरी इं. उपस्थित होते.

सालाबादप्रमाणे‌ मोहरम‌ उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून या उत्सवामध्ये हिंदू मुस्लिम बांधवांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे‌ असे आवाहन मोहरम कमिटीचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष‌‌ शौकत नालबंद यांनी केले आहे.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 5 8 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे