संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालयाचे जिल्हास्तरीय स्क्वॉश व तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये घवघवीत यश
संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालयाचे जिल्हास्तरीय स्क्वॉश व तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये घवघवीत यश

प्रतिनिधी: सूर्यकांत होनप
करमाळा: दि. १४/ महाराष्ट्र राज्य युवक संचालनालय व सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने सोलापूर येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्क्वॉश स्पर्धेमध्ये संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी च्या 14 विद्यार्थ्यांनीं घवघवीत यश मिळवले. या विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
14 वर्ष वयोगट मुली हर्षदा सावंत, अक्षरा वाघमारे.
17 वर्षे वयोगट गीतांजली जाधव, आरती बागल.
19 वर्ष वयोगट शिवानी गोफने, शिवानी गवळी, कार्तिकी शेलार, धनश्री वाघमारे, श्रावणी थोरात.
14 वर्षे वयोगट मुले वेदांत भराटे, संघर्ष रिकीबे.
17 वर्ष वयोगट मध्ये सोहम माने.
19 वर्ष वयोगट रघुवीर पवार व श्रेयश खरात. या सर्व विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक कामगिरी करत यश मिळवले.
या सर्वांची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये
14 वर्षे वयोगट 38 किलो वजन गटांमध्ये युवराज शिंदे प्रथम.
17 वर्ष वयोगट 51 किलो वजन गटांमध्ये सौरभ सोनवणे प्रथम. दोघांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली.
या उत्तुंग यशाबद्दल माजी आमदार संजयमामा शिंदे, संस्थेचे संस्थापक नंदकुमार टोणपे, संस्थेचे सचिव रोहन टोणपे, कोषाध्यक्ष डॉ. श्री रोहित टोणपे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका रुक्मिण वाघमोडे, अतुल गोरे, पंडित आतकर, ज्योती खरात, प्रवीण टोणपे, रुक्मिणी गायकवाड, वैशाली वाडेकर, साधना माळी, धोंडीराम लोंढे, यांनी अभिनंदन व कौतुक केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या सर्व खेळाडूंना क्रीडाशिक्षक श्रीकांत सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.



