Breaking
ब्रेकिंग

मा. मंत्री अ़ॅड. मंगल प्रभात लोढा, कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता महाराष्ट्र यांच्या संकल्पनेतून कारगिल विजयी दिवस उत्साहात साजरा; वीरांना अभिवादन

0 7 6 9 3 7

मा. मंत्री अ़ॅड. मंगल प्रभात लोढा, कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता महाराष्ट्र यांच्या संकल्पनेतून कारगिल विजयी दिवस उत्साहात साजरा; वीरांना अभिवादन

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २७/ मा. मंत्री अ़ॅड. मंगल प्रभात लोढा कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता महाराष्ट्र यांच्या संकल्पनेतून करमाळा शहरातील मदनदासजी देवी औद्योगिक प्रशिक्षण संस्था या ठिकाणी २६ जुलै रोजी कारगिल विजयी दिवस शौर्यचा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला तसेच वीरांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रमुख वक्ते कर्नल श्री. जगदीश अंबादास कदम, माजी सैनिक गणेश लोकरे, उपस्थित होते. कर्नल जगदीश अंबादास कदम यांनी विजयी कारगिल विषयी माहिती सांगितली. तसेच जय जवान जय किसान ची सविस्तर व्याख्या समजून सांगितली व शेती विषयक ही माहिती दिली.

माजी सैनिक गणेश लोकरे यांनी कारगिल मध्ये घडलेल्या घटनांवर भाष्य करत हा विजय यशस्वी भारताचा इतिहास सांगतो असे सांगितले.

याप्रसंगी दिपक चव्हाण, राधेश्याम देवी, आदेश कांबळे, शशिकांत पवार, नरेंद्र ठाकुर, सतिष कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच एम के पाटील प्राचार्य, एस एस गुरव सर, भोयर सर इलेक्ट्रॉनिक, फीटर माने, साठे सर, परदेशी, शिरसाट सर, वाघमारे सर, ठवरे मॅडम व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 3 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे