महायुतीची वज्रमुठ अन जयवंत भाऊंचा पाठिंबा यामुळे भाजपा राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार विजयी होणार:- सुजित बागल यांचा विश्वास

महायुतीची वज्रमुठ अन जयवंत भाऊंचा पाठिंबा यामुळे भाजपा राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार विजयी होणार:- सुजित बागल यांचा विश्वास
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ०५/ सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू आहे. विधानसभा निवडणूक व त्यानंतर झालेल्या आदिनाथ कारखाना आणि नगरपरिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये बिघाडी निर्माण झाल्यामुळे त्याचा फायदा महाविकास आघाडीने घेतला आणि त्यांनी विजय संपादन केला. या उलट जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये परिस्थिती निर्माण झाली असून भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती झाल्यामुळे महायुतीची ताकत करमाळा तालुक्यामध्ये सध्या वाढलेली आहे. त्यातच महाविकास आघाडीचे तुकडे होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून काही उमेदवार निवडणूक रिंगणात मध्ये उतरले आहेत तर, काही उमेदवारांनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. महाविकास आघाडी मधील माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी नारायण पाटील यांना सहकार्य करून आमदार करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली होती. त्या जगताप भाऊंनीही महायुतीला पाठिंबा दिलेला आहे व स्वतः ते प्रचाराच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत यामुळे, करमाळा तालुक्यात इतिहास घडणार असून, ९ तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व १८ उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा सुजित बागल यांनी केला आहे.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्यांमधून सोन्याचा धूर काढू असे दिलेले आश्वासन हवेत विरल्यामुळे सभासदांचा विश्वासघात झालेला आहे. दीड वर्ष पूर्ण होऊनही दीड रुपयाचाही निधी मतदार संघामध्ये आलेला नाही यामुळे सर्वसामान्य मतदारांचा विश्वासघात झालेला आहे. ज्यांच्या पाठिंब्यामुळे आमदारकी मिळाली त्याच नेतृत्वाला झिडकारल्यामुळे विद्यमान आमदारांची प्रतिमा मलीन झालेली आहे. याचा परिणाम येत्या निवडणुकीत निश्चितच दिसणार आहे.
सुजित बागल:- राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष



