Breaking
ब्रेकिंग

अहिल्यानगर तालुका तहसीलदार व महसूल प्रशासनाच्या गलतन कारभारा विरोधात प्रोफेसर चौक ते तहसील कार्यालय पर्यंत हल्लाबोल सत्याग्रह आंदोलन सुरू

0 4 3 3 3 1

अहिल्यानगर तालुका तहसीलदार व महसूल प्रशासनाच्या गलतन कारभारा विरोधात प्रोफेसर चौक ते तहसील कार्यालय पर्यंत हल्लाबोल सत्याग्रह आंदोलन सुरू

प्रतिनिधी: महेश कांबळे

अहिल्यानगर: दि. २६/ अहिल्यानगर जिल्ह्यातील मौजे चिचोंडी पाटील या गावातील सरोदे कुटुंबीय व सरपंच शरद पवार हे गेल्या नऊ दिवसापासून तहसील कार्यालयाच्या आवारात घर संसार घेऊन उपोषणासाठी बसले आहेत. या चिचोंडी पाटील गावातील सरोदे कुटुंबीयांची चोरी गेलेली जमीन परत मिळवण्यासाठी हे उपोषण सुरू आहे, मात्र नऊ दिवस उलटून गेले तरी यांना न्याय मिळत नाही नाईलाजाने व तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब ज्येष्ठ नागरिकांना तहसील व महसूल अधिकारी कर्मचारी यांच्याकडून वेगवेगळ्या माध्यमातून पिळवणूक होत आहे. वर्षानुवर्ष तारखा पडून अनेक प्रकरणांवर निकाल होत नाही. सातबारा दुरुस्ती, बिनशेती प्रकरणी, संजय गांधी योजना, शेत रस्ता प्रकरने, रेशन कार्ड वरील नाव दुरुस्ती यासह अनेक प्रकरणांवर वर्षानुवर्ष सुनावण्या होतात व ठराविक लोकांचेच काही देवाण-घेवाण झाल्यानंतर निकाल लागले जातात. तारीख पे तारीख करून सर्वसामान्य शेतकऱ्याची खूप मोठी पिळवणूक या प्रशासनाकडून केली जाते, त्यामुळे काल सरपंच शरद पवार व सरोदे कुटुंबीय सोबतच सर्व पंचक्रोशीतील अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने तहसीलदार तथा तालुका व महसूल प्रशासनाच्या गलथान कारभारा विरोधात हल्लाबोल सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे.

यावेळी सरपंच शरद पवार, प्रकाश पोटे, अरुण रोडे, नितीन पाटील निगडे, युवानेते पांडुरंग दातीर, एडवोकेट सतीश पालवे, पैलवान अमोल वाघ, सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थ व अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी तहसीलदार साहेब बाहेर या बाहेर या, निकाल द्या निकाल द्या तहसीलदार साहेब निकाल द्या अशा घोषणांनी प्रोफेसर चौक ते तहसील कार्यालय परिसर दणाणून सोडला होता.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 3 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे