Breaking
ब्रेकिंग

जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या ३९ व्या स्मृतिदिनाचे १० आॕगष्ट रोजी अलिबाग येथे आयोजन

0 7 6 9 4 1

जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या ३९ व्या स्मृतिदिनाचे १० आॕगष्ट रोजी अलिबाग येथे आयोजन

प्रतिनिधी: राजेश बाष्टे

अलिबाग: दि. ०९/ पंजाब प्रश्न पूर्णतः नष्ट होण्यासाठी सुवर्ण मंदिरात सैन्य घुसविल्यामुळे शहिद झालेले, अलिबागचे सुपुत्र भारताचे माजी लष्करप्रमुख अरुणकुमार वैद्य यांचा ३९ वा स्म्रुतिदिन अलिबाग येथे आयोजित करण्यात आला आहे. इंडस्ट्रियल हायस्कूलचे माजी विद्यार्थी असलेले जनरल वैद्य भारताचे लष्करप्रमुख असताना २९ सप्टेंबर १९८५ रोजी सदर हायस्कूलला सदिच्छा भेट दिली. लष्करप्रमुख पदावरून सेवानिव्रुत्त होताच त्यांचे शासकीय संरक्षण (सिक्युरिटी) काढले गेले. ते पुणे येथे आयुष्याची सायंकाळ समाधानाने घालवीत असता शीख आतिरेक्याँकडून दि. १० आ़़ॕगष्ट १९८६ रोजी शहिद झाले.

अलिबाग शहरावर शोककला पसरली “शहिद” जनरल वैद्य यांच्या स्म्रुति चिरकाल राहण्यासाठी इंडस्ट्रियल हायस्कूलला पत्रकार बळवंत वालेकर यांच्या पाठपुराव्यामुळे माजी लष्कर प्रमुख जनरल अरूणकुमार वैद्य असे नाव को. ए. सो. ने दिले, तसेच सतत पाठपुरावा केल्यामुळे “शहिद” वैद्य यांचे तैलचित्र जिल्हा प्रशासनाकडून पोलिस अधिक्षक अलिबाग यांच्या कार्यालयासमोरील भिंतीवर लावले गेले.

“शहिद” लष्करप्रमुख अरुणकुमार यांची पुण्यतिथी अलिबाग येथे शासकीय इतमामाने साजरी होण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार बाळवंत वालेकर यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्या शिफारशीसह प्रकरण मंत्रालय मुबई येथे पाठविले आहे. तेथील सामान्य प्रशासन विभागाने No, GAD- 49010 / DESK- 29 दि. १८ / १ /२५ नुसार पुढील कर्यवाहीसाठी मुख्यमंत्री महोदयांकडे पठविले आहे. त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. पुण्यतिथीचा कार्यक्रम दि. १० /८ /२५ रोजी सकाळी १० वाजता अ, ता. शि. प्र. मं. ची शिशुविहार प्राथमिक शाळा, सरखेल आंग्रेवाड्यासमोर अलिबाग येथे आयोजिला आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

आपले विनीत:-

प्रशांत नाईक मा. नगराध्यक्ष, रघूजीराजे आँग्रे आ़ंग्रेंचे वंशज, योगेश मगर अध्यक्ष सहयोग पत, बळवंत वालेकर ज्येष्ठ पत्रकार.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे