लायन्स क्लब ऑफ श्रीबाग व आदिवासी विकास संस्थेचा उपक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

लायन्स क्लब ऑफ श्रीबाग व आदिवासी विकास संस्थेचा उपक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
प्रतिनिधी: राजेश बाष्टे
अलिबाग: दि. २१/ अलिबाग तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या भाल येथील खाजगी प्राथमिक शाळेत लायन्स क्लब ऑफ श्रीबाग व आदिवासी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना शालेय दप्तरे, वह्या, पेन आदी शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. डिस्ट्रिक्ट क्लबचे पदाधिकारी एम.जे.एफ. गणात्रा व के.डी. पाटील सर यांच्या सहकार्यातून साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब ऑफ श्रीबागचे अध्यक्ष डॉ. ॲड. के. डी. पाटील सर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव व खजिनदार दत्तात्रय माळवी सर, संस्था समिती सदस्य जगदीश पाटील सर, रिजन चेअरपर्सन विजय वनगे, ॲड. विक्रांत पाटील, डॉ. संदीप वारगे, लायन श्री घोसाळकर सर, लायन श्री गायकवाड सर, लायन पैठणकर सर, तसेच अलिबाग विकास संस्थेचे अध्यक्ष जानू शिद आदी मान्यवर उपस्थित होते.
गरीब मुलांचा आधार ठरली आहे प्राथमिक शाळा भाल असे केडी पाटील यांनी सांगितले. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आले. मालवी सर, जगदीश पाटील सर, विक्रांत पाटील, वारगे सर, जानू शिद यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेच्या प्रगतीबद्दल कौतुक केले. शिक्षण हीच खरी प्रगतीची किल्ली आहे आणि ती प्रत्येक विद्यार्थ्याच्या हाती पोहोचवण्याचे कार्य म्हणजे खऱ्या अर्थाने समाजसेवा होय. अलिबाग तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या भाल येथील शाळेत लायन्स क्लब ऑफ श्रीबाग व आदिवासी विकास संस्था यांच्या वतीने करण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत नव्या आशेचा किरण दिसून आला. वह्या, दप्तरे, पेन या साधनांमुळे फक्त शाळेतील शिक्षणच नव्हे तर त्यांच्या स्वप्नांनाही नवे पंख मिळाले.
या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे कार्य हे आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असून, शिक्षणाच्या वाटचालीत अशी साथ मिळणे हेच खरे भाग्य मानावे लागेल. सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या या उपक्रमातून ‘शिक्षण हेच सर्वश्रेष्ठ दान’ हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रेश्मा वारगे यांनी तर नियोजन शाळेचे मुख्याध्यापक गुलाब काळे व शिक्षिका वर्षा माळवी यांनी केले. या उपक्रमामुळे आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची साधने उपलब्ध झाली असून पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
अप्रतिम समाजकार्य, आपल्या सर्व टिमला अनेकांचे धन्यवाद. आपल्या लायन्स क्लबचा नावलौकिक सर्वदूर वा-यासम अतिवेगाने जगभर पसरेल याबाबत तिळमात्र शंका नाही:- श्रीरंग घरत. चेअरमन, कोएसो वा. ग. रानडे थळ हायस्कूल, अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघटना भाल नाक.