Breaking
ब्रेकिंग

लोकमंगल सहकारी नागरी पतसंस्था करमाळा शाखेच्या वतीने दहावी व बारावी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान

0 7 9 7 8 7

लोकमंगल सहकारी नागरी पतसंस्था करमाळा शाखेच्या वतीने दहावी व बारावी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ०३/ आज दिनांक 02 जून 2026 रोजी लोकमंगल सहकारी नागरी पतसंस्था करमाळा शाखेमध्ये दहावी व बारावी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. यामध्ये करमाळा शहरातील हायस्कूल तसेच महाविद्यालयामधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान कार्यक्रम करमाळा विभागाच्या विभागीय कार्यालय कृष्णाजी नगर येथे आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला करमाळा नगरीचे आराध्य दैवत श्री कमला भवानी मातेच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सन्मान म्हणून गुणवंत विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प, भेटवस्तू ,अहवाल सन्मान पत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक, खातेदार, श्री माळवदकर सर, शाखेचे सल्लागार श्री खान चाचा, श्री. बिपीन दोषी श्री रोडगे सर डॉ. सौ. दोषी मॅडम, विभाग प्रमुख परदेशी रमण, शाखाधिकारी व कर्मचारी इं. उपस्थित होते.

उपस्थित सर्वांना लोकमंगल परिवार व पतसंस्थेच्या विविध योजनांविषयी माहिती व प्रस्तावना परदेशी साहेब यांनी केले. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना शाखेचे सल्लागार डॉ. दोषी मॅडम यांनी पुढील वाटचाल कशी असावी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे:-

1)मेहेर प्रेमजीत आत्तम:- 77.% 12वी

2) स्नेहल संतोष जायभाय:- 60.% 12 वी

3) आरती महादेव रासकर:- 71.40% 12 वी

4) पूजा महादेव रासकर:- 66.20% 12 वी

5)विनायक मुकुंद राऊत:- 93.20% 10वी

6) अनुष्का अर्जूनसिंह परदेशी:- 74.40% 10 वी 

7) सार्थक मकरंद वनारसे:- 78% 10 वी

8) मुक्त चेतन कदम:- 51.20% 12वी

9) सार्थक ज्योतिराम लावंड:- 55.60% 10 वी

4.5/5 - (2 votes)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 9 7 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे