कुर्डूवाडी येथे भाई वांगडे फाउंडेशन व संजय मामा शिंदे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अन्विक्षा 2026 तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व स्पर्धा उत्साहात संपन्न

कुर्डूवाडी येथे भाई वांगडे फाउंडेशन व संजय मामा शिंदे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अन्विक्षा 2026 तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व स्पर्धा उत्साहात संपन्न

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
कुर्डूवाडी: दि. ०६/ कुर्डूवाडी येथे भाई फाउंडेशन ज्ञानश्री इन्स्टिट्यूट इंजीनियरिंग कॉलेज अँड टेक्नॉलॉजी सातारा व संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अन्विक्षा 2026 माढा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन 5 जानेवारी 2026 रोजी कुर्डूवाडी येथील अयोध्याश्री हॉल येथे संपन्न झाले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे व उद्घाटक रणजीतभैया शिंदे (मा. जिल्हा परिषद सदस्य तथा चेअरमन जिल्हा दूध संघ), विनायकराव पाटील (मा. आमदार माढा), शिवाजीराजे कांबळे (मा. समाज कल्याण सभापती सोलापूर), बंडू नाना ढवळे (मा. जिल्हा परिषद सदस्य सोलापूर), आप्पासाहेब उबाळे (मा. जिल्हा परिषद सदस्य सोलापूर), मीनलताई साठे (नगराध्यक्ष माढा), कल्पनाताई जगदाळे (उपनगराध्यक्ष माढा), भाई फाउंडेशनचे व्यवस्थापक रोहित वांगडे, नंदकुमार टोणपे (संस्थापक अध्यक्ष जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ शिराळ), रोहन टोणपे (सचिव जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ) या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले व तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
सदर प्रदर्शनातील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक तिन्ही विभागातून काढण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभ पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत व भाई वांगडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अध्यक्ष ज्ञानेश्वर वांगडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून 200 वैज्ञानिक प्रयोग आले होते. यावेळी ज्ञानेश्वरी इन्स्टिट्यूट चे व्यवस्थापक रोहित वांगडे, विमलेश्वर विद्यालयाचे दत्तात्रय ननवरे, विठ्ठलराव शिंदे विद्यालय आढेगाव चे मुख्याध्यापक बंडू जाधव, जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक नंदकुमार टोणपे, सचिव रोहन टोणपे, ट्विंकल स्टार स्कूलचे अध्यक्ष प्रा. हरिश्चंद्र गाडेकर, भाई वांगडे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग कॉलेज साताऱ्याचे प्राचार्य, सर्व स्टाफ तसेच संजय मामा शिंदे विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व स्टाफ, विद्यार्थी तालुक्यातून आलेल्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक विज्ञान शिक्षक विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.



