ब्रेकिंग
जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये सौरभ सोनवणे अजिंक्य; पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड
0
7
6
9
3
2
जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये सौरभ सोनवणे अजिंक्य; पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ०९/ सोलापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालयाने घवघवीत यश प्राप्त केले आहे. कुर्डूवाडी येथील सौरभ सोनवणे याने 17 वयोगट 51 किलो वजन गटांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला व त्याची अहिल्यानगर येथे होणाऱ्या पुणे विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
त्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नंदकुमार टोणपे, संस्थेचे सचिव रोहन टोणपे, संस्थेचे कोषाध्यक्ष डॉ. श्री रोहित टोणपे, क्रीडाशिक्षक मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
0
7
6
9
3
2



