Breaking
ब्रेकिंग

प्रतिथयश नावाजलेल्या डॉक्टरांनी नाकारलेल्या हाताच्या बोटाची सर्जरी डॉ. महेश भोसले यांनी केली यशस्वी

0 7 6 9 3 7

प्रतिथयश नावाजलेल्या डॉक्टरांनी नाकारलेल्या हाताच्या बोटाची सर्जरी डॉ. महेश भोसले यांनी केली यशस्वी

प्रतिनिधी: सूर्यकांत होनप

करमाळा: दि. २१/करमाळा येथील ११ वर्षीय मुलाचे हाताचे एक बोट पुढील बाजूस पूर्णपणे तुटलेले असताना त्याची सर्जरी अशक्य असल्याचे प्रतिथयश नावाजलेल्या अनेक डॉक्टरांनी सांगितले असता हताश निराश झालेल्या पालकांना डॉ. भोसले यांनी दिलासा देत व अनुभवाच्या बळावर सदर बोटावर यशस्वी शस्त्रक्रिया करून रुग्णाला बरे केले.

सदर घटनेची माहिती अशी की मी पत्रकार सुर्यकांत होनप. माझा मुलगा अर्णव सुर्यकांत होनप वय ११ वर्षे हा खेळत असताना अनवधाने त्याचा हात दरवाजात अडकून त्याच्या हाताच्या बोटास इजा झाली. बोटाचे पहिले बेर जवळपास तुटले. अंदाजे फक्त अर्धा सें.मी. शिल्लक राहिले. पूर्णपणे बोट कट झाले होते तेव्हा मी करमाळा शहरातील नावाजलेल्या डॉक्टरांकडे गेलो असता त्या डॉक्टरांनी हाताच्या बोटाला बांधलेली पट्टी न उघडता जखम किती झालेली आहे हे न पाहता मोबाईल मध्ये काढलेला फोटो पाहून सांगितले की या बोटाचा तुकडा काढून टाकावा लागेल सर्जरी होणार नाही हे बोट जुळून येणार नाही व मला आता दोन ऑपरेशन असल्याने तुम्ही उद्या सकाळी या. अशा अवस्थेत कोणत्या मुलाचे पालक आपल्या मुलाला अशा अवस्थेत रात्रभर घरी घेऊन बसणार होते ? तेव्हा मी इतर आणखीन दोन ठिकाणी ऑर्थोपेडिक तज्ञांशी चर्चा केली असता त्यांनीही मला शंभर टक्के सक्सेस होणार नाही असेच सांगितले. तेव्हा मी हतबल व निराश झालो. मला मुलाच्या वेदना व झालेली जखम बघवत नव्हत. तेव्हा मला डॉक्टर महेश भोसले यांची आठवण झाली व मी सरळ डॉक्टर महेश भोसले यांच्या हॉस्पिटलमध्ये गेलो. डॉ. महेश भोसले यांनी तुटलेल्या हाताच्या बोटाचे व्यवस्थित निरीक्षण केले बोटाला किती जखम झालेली आहे ते व्यवस्थित पाहिले व सर्वप्रथम आम्हाला मानसिक आधार दिला विश्वास दिला व सांगितले की आपण शंभर टक्के प्रयत्न करू याला काही होणार नाही हे बोट पूर्वीसारखे होऊन जाईल काळजी करूं नका तेव्हा मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि डॉक्टर साहेबांना सर्जरी करण्यास विनंती केली. काही वेळातच डॉक्टरांनी माझ्या मुलाच्या हाताच्या बोटाची सर्जरी केली व चार दिवसांनी येण्यास सांगितले. चार दिवसानंतर जेव्हा आम्ही ड्रेसिंग करण्यासाठी गेलो तेव्हा डॉक्टरांनी पट्टी उघडुन जखम पाहिली असता आम्हाला सांगितले की शस्त्रक्रिया यशस्वी झालेली आहे. आता घाबरण्याचे काहीही कारण नाही . तेव्हा आमच्या जीवात जीव आला. डॉक्टर महेश भोसले यांच्या आत्मविश्वास व अथक प्रयत्नामुळे माझ्या मुलाच्या हाताचे बोट अधु होण्यापासून वाचले. आम्ही डॉक्टर महेश भोसले यांचे शतशः ऋणी आहोत.

डॉ. महेश भोसले यांच्या हॉस्पिटलमध्ये पेशंटशी वार्तालाप केला असता असे ऐकण्यात आले की डॉक्टर भोसले कुठल्याही पेशंटची आर्थिक पिळवणूक करीत नाहीत व कुठल्याही पेशंटचे पैशासाठी उपचार थांबवत नाहीत त्यांच्याकडे येणाऱ्या पेशंट कडून ते माफक फी घेतात. व कुठल्या पेशंटची जर सर्जरी करण्याची असेल तर त्या पेशंटला कमीत कमी त्रास होईल या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देतात. गरज असेल तरच पेशंटचे ऑपरेशन करतात गरज नसेल तर औषध गोळ्यांवर पेशंटला बरे करतात. नावाजलेल्या डॉक्टरांनी नाकारलेली सर्जरी डॉक्टर महेश भोसले यांच्या प्रयत्नाने यशस्वी झाली.

यादरम्यान मला डॉक्टर बिपिन परदेशी, डॉक्टर रविकिरण पवार व डॉक्टर संतोष पाटील (धाराशिव) यांचे मोलाचे सहकार्य लागले.

आमच्याकडे कोणतेही पेशंट आले असता आम्ही अगोदर पेशंटचा त्रास पाहता त्यांना प्रथम मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर रुग्णाला जी काही इजा झालेली आहे त्याचा बारीक अभ्यास करून त्यावर योग्य तो उपचार करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे पेशंट व त्याच्या पालकांनी आमच्यावर टाकलेला विश्वास व त्यांच्या देवावरील श्रध्देने आशीर्वादाने उपचार सर्जरी यशस्वीरित्या पार पडते. – –

(डॉ. महेश स. भोसले.

M.B.B.S., D.Ortho, A.F.I.H. अस्थिरोग तज्ञ व जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन.)

4.7/5 - (3 votes)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 3 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे