करमाळ्यात अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी जागेची मागणी; अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या वतीने नगराध्यक्षा सौ. मोहिणीताई सावंत यांना लेखी निवेदन

करमाळ्यात अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी जागेची मागणी; अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या वतीने नगराध्यक्षा सौ. मोहिणीताई सावंत यांना लेखी निवेदन

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. १८/ राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्यासाठी करमाळा नगरपालिका हद्दीत जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान, खांबेवाडीच्या वतीने नगराध्यक्षा मा. सौ. मोहिणीताई संजय सावंत यांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात देवीचामाळ रोडलगत नगरपालिका हद्दीमध्ये अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्यास जागा मिळावी यासाठी प्रतिष्ठान अनेक दिवसांपासून यासाठी पाठपुरावा करत आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी स्मारकाची गरज असल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
नगराध्यक्षा मोहिणीताई सावंत यांनी निवेदन स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सकल धनगर समाज व बहुजन समाज उपस्थित होता.


