Breaking
ब्रेकिंग

कुणबी प्रमाणपत्र देताना प्रांत कार्यालयाकडून अडवणूक:- सकल मराठा समाजाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार 

0 7 6 9 4 3

कुणबी प्रमाणपत्र देताना प्रांत कार्यालयाकडून अडवणूक:- सकल मराठा समाजाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

प्रतिनिधी: सूर्यकांत होनप

करमाळा: दि. १७/ कुर्डवाडी प्रांत ऑफिस मधून जाणीवपूर्वक मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दाखले काढण्यास त्रास दिला जात आहे. याबाबत लवकरच मोठे जन आंदोलन करमाळा येथे उभा करणार आहोत असे मराठा समन्वय व मराठा सेवा संघाचे करमाळा तालुका अध्यक्ष सचिन काळे यांनी सांगितले आहे. कुणबी जात प्रमाणपत्र देताना जाणीवपूर्वक अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारी वाढत असताना सकल मराठा समाज करमाळा यांच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. कुडूवाडी येथील प्रांताधिकारी कार्यालयाकडून कुणबी दाखल्यांच्या प्रकरणांमध्ये अनावश्यक अडथळे आणले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

अर्जदाराने प्रतिज्ञापत्रावर स्वतः सही करून ‘सेल्फ अटेस्टेड’ कागदपत्रे दिली असतानाही ती कारण नसताना नाकारली जात आहेत. कुटुंबातील एका सदस्याच्या प्रकरणाला तहसीलदारांची प्रमाणित प्रत ग्राह्य धरली जात असताना त्याच कुटुंबातील दुसऱ्या प्रकरणासाठी ओरिजनल कागदपत्रांची मागणी करून अडवणूक केली जात आहे. तसेच कुटुंबामध्ये आधीपासून जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र उपलब्ध असतानाही त्याची दखल घेतली जात नाही, असा आरोप यावेळी निवेदनामध्ये करण्यात आला.

यावेळी निवेदनामध्ये करमाळा तहसील कार्यालयातून कुडूवाडी प्रांत कार्यालयाकडे पाठवलेली प्रकरणे त्रुटी दाखवून परत पाठवली जात असल्यास, ती फेरसादर करताना तहसीलदारांची सही घेऊन करमाळ्यातूनच ऑनलाइन करण्याची सुविधा द्यावी अशी मागणीही करण्यात आली.

यावेळी माऊली पवार, सचिन काळे, दादासाहेब तनपुरे, दीपक गायकवाड, उमेश काळे आदी मराठा बांधव उपस्थित होते.

 

वरील सर्व अडवणुकीचे मुद्दे सकल मराठा समाज करमाळा यांच्या वतीने आपणास समोर स्पष्ट मांडणी केली आहे कृपया आपण संबंधितांना तात्काळ सूचना द्याव्यात अन्यथा सकल मराठा समाज करमाळा यांच्यावतीने संबंधितांचा निषेध नोंदवून 1 जानेवारी 2026 रोजी नववर्षाच्या स्वागतावर शासनाचा, कलेक्टर ऑफिस सोलापूर, कुर्डूवाडी प्रांत ऑफिसचा निषेध म्हणून एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येईल याची नोंद कृपया कलेक्टर साहेब यांनी घ्यावी ही विनंती.

सचिन काळे:- मराठा समन्वय व मराठा सेवा संघ करमाळा तालुका अध्यक्ष

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे