भाई वांगडे इन्स्टिट्यूट सातारा व संजय मामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

भाई वांगडे इन्स्टिट्यूट सातारा व संजय मामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
कुर्डूवाडी: दि. ०२/ माढा येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. भाई फाउंडेशन ज्ञानश्री इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज सातारा व संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोध्याश्री मंगल कार्यालय कुर्डूवाडी येथे दिनांक 5 जानेवारी सकाळी 9 वाजता माढा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या अंगी वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा या उदात्त हेतूने हे प्रदर्शन आयोजित केले आहे. माढा तालुक्यातील विविध मान्यवरांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन व बक्षीस वितरण होणार आहे. ज्ञानेश्वरी इन्स्टिट्यूट चे सर्व प्राध्यापक वर्ग तसेच संस्थापक अध्यक्ष या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये प्राथमिक माध्यमिक, उच्च माध्यमिक गटानुसार बक्षीस देण्यात येणार आहे.
5 वी ते 7 वी गटासाठी अनुक्रमे प्रथम क्रमांक 7000, द्वितीय क्रमांक 5000, तृतीय क्रमांक 3000.
माध्यमिक गट 8 वी ते 10 वी प्रथम क्रमांक 8000, द्वितीय क्रमांक 6000, तृतीय क्रमांक 4000.
उच्च माध्यमिक गट 11 वी ते 12 वी प्रथम क्रमांक 10000, द्वितीय क्रमांक 7000, तृतीय क्रमांक 5000 याप्रमाणे बक्षीस देण्यात येणार आहे. सहभागी शाळा मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह वाटप करण्यात येणार आहे.
भाई वांगडे इन्स्टिट्यूट चे रोहित वांगडे व जिजामाता शिक्षण संस्थेचे रोहन टोणपे यांनी माढा तालुक्यातील सर्व शाळा व मुख्याध्यापक शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थी यांना यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.



